• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Google आणि Apple ने बॅन केले 8 लाखांहून अधिक धोकादायक Apps, तुमच्या फोनमधूनही लगेच करा डिलीट

Google आणि Apple ने बॅन केले 8 लाखांहून अधिक धोकादायक Apps, तुमच्या फोनमधूनही लगेच करा डिलीट

2021 च्या पहिल्या सहा महिन्यात गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर 8,13,000 हून अधिक अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Google ने आपल्या Google Play Store मधून आणि Apple ने आपल्या Apple App Store वरुन लाखो Apps बॅन केले आहेत. Pixalate च्या H1 2021 डीलिस्टेड मोबाइल अ‍ॅप्स रिपोर्ट’मधून मिळालेल्या माहितीनुसार, 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर 8,13,000 हून अधिक अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. हे 8 लाख अ‍ॅप्स डीलिस्ट करण्यापूर्वी गुगल प्ले स्टोरवरुन 9 अब्ज वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. कॅलिफोर्नियाच्या पिक्सालेटनुसार, Apple च्या अ‍ॅप स्टोरवरुन अ‍ॅप हटवले जाण्याआधी या अ‍ॅप्सला 2.1 कोटी कस्टमर रिव्ह्यूज आणि रेटिंग्स होते. त्यामुळे अ‍ॅप स्टोरवरुन हटवण्यात आल्यानंतरही लाखो युजर्सच्या स्मार्टफोनवर हे अ‍ॅप्स अद्यापही असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, Google Play Store वरुन 86 टक्के आणि Apple App Store वरुन 89 टक्के मोबाइल अ‍ॅप्सने 12 वर्ष आणि त्याहून कमी वयोगटातील मुलांना टार्गेट केलं. यात 25 टक्के प्ले स्टोर अ‍ॅप आणि 59 टक्के अ‍ॅपल स्टोर अ‍ॅप्समध्ये कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी नव्हती.

  Alert! अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं

  का हटवण्यात आले Apps - जवळपास 66 टक्के गुगल अ‍ॅप्समध्ये कमीत-कमी एक धोकादायक परमिशन होती. या धोकादायक परमिशनला रनटाइम परमिशनही म्हणतात. यामुळे हे अ‍ॅप्स युजरच्या डेटापर्यंत सहजपणे पोहोचतात, ज्यामुळे सिस्टम आणि इतर अ‍ॅप्सवर याचा परिणाम झालेला दिसतो. हटवण्यात आलेल्या अनेक अ‍ॅप्सची कॅमेरापर्यंत पोहोच होती. त्याशिवाय यात GPS कॉर्डिनेटही होता.

  Phoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा

  गुगल प्ले स्टोर (Google Play Store) अँड्रॉईड स्मार्टफोनचे (Android Smartphone) अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी सर्वात सुरक्षित सोर्स मानला जातो. परंतु गुगल प्ले स्टोरवर असे काही अ‍ॅप्स लिस्टेड आहेत, जे तुमच्या मोबाईलची सुरक्षा धोक्यात टाकतात. Google आपल्या अ‍ॅप स्टोरची तपासणी करतं आणि वेळोवेळी त्यावर कारवाईही करतं. परंतु तरीही या प्लॅटफॉर्मवर असे अ‍ॅप्स आहेत, जे धोकादायक ठरू शकतात.

  ... तर तुमचा फोन हॅक झाला असू शकतो

  Google ने प्ले स्टोरवर असणारे काही धोकादायक अ‍ॅप्स नुकतेच बॅन केले आहेत. या अ‍ॅप्सचा वापर हॅकर्स त्यांच्या खासगी फायद्यासाठी, युजर्सच्या फसवणुकीसाठी आणि त्यांचे पर्सनल डिटेल्स चोरी करण्यासाठी करत होते. तुमच्याही फोनमध्ये असे काही अ‍ॅप्स असतील, तर ते लगेच डिलीट करणं गरजेचं आहे.
  Published by:Karishma
  First published: