त्यानंतर Add more complaint वर क्लिक करावं लागेल, ज्यात मोबाईलच्या मालकाचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आयडेंटिटीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. वेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्यानंतर वेरिफिकेशन होईल. याप्रमाणे फायनल सबमिट करुन मोबाईल फोन ब्लॉक होईल. तसंच फोनबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, ती युजरकडे पोहोचवली जाईल.