नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. घरातला कॉम्प्युटर असो की मोबाइल प्रत्येक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध आहे. त्यामुळे हातात स्मार्टफोन असेल तर सगळं विश्व त्यात समावलं आहे असा आत्मविश्वास आपल्याला असतो. पण या दोन्हींची सुरक्षितता हा मुद्दा असतोच. आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाउंटदेखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही.
व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष म्हणजे आपली महत्त्वाची माहिती हॅक (hack) झाली आहे याबद्दल आपल्याला माहितीही नसते. अशा परिस्थितीत आपला स्मार्टफोन आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स (tips) आणि युक्त्या सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला मालवेअर (malware) पासून आणि स्वतःला सायबर क्राईमचे बळी होण्यापासून वाचवू शकाल. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मालवेअर हे एक घुसखोरी करणारं सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या मोबाइल किंवा कॉम्पुटरसाठी घातक ठरू शकतं. हॅकर्स अशा प्रकारचे सॉफ्टवेअर तुमचा वैयक्तिक डेटा चोरी करण्यासाठी वापरतात. व्हायरस, ट्रोजन व्हायरस, वर्म्स, स्पायवेअर आणि रॅन्समवेअर अशी मालवेअरची काही उदाहरणं आहेत.
तुमचा फोन सुरक्षित आहे की नाही किंवा त्यामध्ये व्हायरस (virus) आला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या सोप्या मार्गांनी तुम्ही शोधू शकता.
जर तुम्ही तुमचा मोबाइल वापरत नसाल आणि तरीही तो गरम होत असेल तर तुमचा फोन हॅक झाला असू शकतो. मोबाइल तुमच्या वापराने नव्हे तर हॅकर्सच्या वापराने गरम होऊ शकतो.
जर तुमच्या मोबाइलमधील इंटरनेट लवकर संपत असेल, तसंच बिल जास्त येत असेल किंवा बॅटरी खूप लवकर संपत असेल तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मोबाइलवर अनेक अनावश्यक जाहिराती पाहायला मिळत असतील तर सावधगिरी बाळगा. या जाहिरातींद्वारे मालवेअर तुमच्या मोबाइलमध्ये येऊ शकतात.
Renault 10 years celebration: आता खरेदी करा Car आणि 2022 मध्ये द्या पैसे, पाहा काय आहे ही खास ऑफर
तुमचे मित्र किंवा नातेवाईक यांना तुमच्या फोनवरून स्पॅम मेसेज (Spam messages) येत असतील, तर याचा अर्थ तुमच्या फोनमध्ये मालवेअर आहे. तसंच हे मालवेअर या मेसेजद्वारे तुमच्या मित्र आणि नातेवाईकांच्या फोनमध्ये सहज प्रवेश करू शकतात.
तुमच्या फोनमध्ये असे अनेक अॅप्स (apps) देखील असू शकतात जे तुम्ही डाउनलोड केलेले नाहीत. असे अॅप्स त्वरित डिलीट करा. कारण या अॅप्समध्ये मालवेअर असण्याची शक्यता आहे. प्रत्येक वेळी थोड्या वेळाने आपल्या फोनवरील सर्व अॅप्सवर एक नजर टाका. जर तुम्हाला कोणते अॅप अधिक इंटरनेट वापरत असल्याचं दिसून आलं तर ते अॅप डिलीट करा. तसंच जे अॅप्स तुम्ही जास्त वापरत नाही आणि त्यांना प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर चांगले रिव्ह्यू मिळाले नाहीत ते तुम्ही काढून टाकू शकता.
तुम्हाला जे अॅप डाउनलोड करायचे आहे ते फक्त Google Play Store किंवा App Store वरून अधिकृतपणे डाउनलोड करा. तिथंही डाउनलोड करण्यापूर्वी अॅप नीट तपासा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते काही परवानग्या मागते. तुम्ही कोणत्या परवानग्या देत आहात हे लक्षात ठेवा. आपल्या फोनच्या संरक्षणासाठी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Virus