• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Trojan Malware: सावधानी हटी दूर्घटना घटी! अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं

Trojan Malware: सावधानी हटी दूर्घटना घटी! अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं

जर तुम्ही देखील अँड्रॉइड फोनद्वारे बँकिंग (Mobile Banking Service) सेवांचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही दूर्लक्ष केल्यास सायबर हल्ल्याचे शिकार ठरू शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: जर तुम्ही देखील अँड्रॉइड फोनद्वारे बँकिंग (Mobile Banking Service) सेवांचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशाच्या फेडरल सायबर सिक्युरिटी एजन्सीने एका ताज्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, भारतीय सायबर स्पेसमध्ये बँकिंग ट्रोजन मालवेअर (Trojan Malware) सापडले आहे.  हे ट्रोजन मालवेअर अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांवर सायबर हल्ल्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या मालवेअरने आधीच 27 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना लक्ष्य केले आहे. भारतीय कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (Indian Computer Emergency Response Team/CERT-In) कडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, फिशिंग मालवेअर 'इन्कम टॅक्स रिफंड'च्या स्वरुपात दिसत आहे. यामुळे ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता प्रभावीपणे धोक्यात येऊ शकते. परिणामी मोठ्या प्रमाणावर हल्ले आणि आर्थिक फसवणुकीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वाचा-उशीरा आयटीआर भरला तर द्यावा लागणार भरभक्कम दंड, या करदात्यांना मिळणार सूट या अॅडव्हायजरीमध्ये असे म्हटले आहे की भारतीय बँकिंग ग्राहकांना ड्रिनिक अँड्रॉइड मालवेअर (Drinik Android Malware) वापरून नवीन प्रकारच्या मोबाइल बँकिंग कँपेनद्वारे लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ड्रिनिकने 2016 मध्ये SMS चोरी करण्याच्या स्वरुपात सुरुवात केली होती. आणि अलीकडेच याचे बँकिंग ट्रोजन विकसित झाले आहे. यामुळे फिशिंगचा धोका वाढला आहे. युजर्सची गोपनीय बँकिंग माहिती प्रविष्ट करण्यास हा मालवेअर भाग पाडतो. त्यामुळे तुम्ही मोबाइल बँकिंग वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. हे वाचा-पत्नीच्या पगारावर सुरू होता संसार, आज या व्यवसायातून आहे कोट्यवधीची उलाढाल 27 पेक्षा जास्त बँकांचे ग्राहक ठरलेत लक्ष्य सीईआरटी-इनने म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त भारतीय बँकांच्या ग्राहकांना आधीच या सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी तसंच फिशिंग, हॅकिंग आणि ऑनलाइन हल्ल्यांपासून सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी सीईआरटी-इन ही फेडरल तंत्रज्ञान शाखा आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: