नवी दिल्ली, 6 डिसेंबर : देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता Google Pay चा वापर करणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच कंपनी याच्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. कोट्यवधी युजर्सवर 1 जानेवारीपासून या बदलांचा परिणाम होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सवर Google च्या काही नियमांत बदल केला जाऊ शकतो. या बदलाचा थेट परिणाम ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या युजर्सवर होईल. नवा नियम गुगलच्या सर्व सर्विसेसवर लागू होईल, ज्यात Google Ads, Youtube, Google Play Store आणि Google Pay सामिल आहे.
1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो नवा नियम -
नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होऊ शकतात. यात Google आपल्या ग्राहकांच्या कार्ड डिटेल्सचा डेटा सेव्ह करणार नाही. आतापर्यंत गुगल आपल्या ग्राहकांच्या पेमेंटसंबंधित डिटेल्स कार्ड नंबर, एक्सपायरी डेटपासून इतर डिटेल्स सेव्ह करत होतं. परंतु नव्या वर्षापासून डेटा सेव्ह होणार नसल्याची चर्चा आहे.
हा नियम लागू झाल्यानंतर युजर्सला Google Pay ने पेमेंट करताना आपले कार्ड डिटेल्स पुन्हा टाकावे लागतील. त्यानंतरच पेमेंट करता येईल. Google Pay च्या मॅन्युअल ऑनलाइन पेमेंट नियमांत बदल करण्यात येणार आहे.
युजर्सवर काय होईल परिणाम?
Google चा नियम लागू झाल्यानंतर Google Pay युजर्स आपले कार्ड डिटेल्स सेव्ह करू शकत नाही. पेमेंट करण्याआधी डिटेल्स एंटर करावे लागतील. म्हणजेच युजरला आपल्या कार्डची एक्सपायरी डेट आणि कार्ड नंबर लक्षात ठेवावा लागेल.
जर युजर मास्टर कार्ड आणि वीजाचा वापर करत असतील, तर नव्या फॉर्मेटमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करण्यासाठी ऑथराइज्ड करावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Online payments, Rbi