मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Paytm वरुन डिजिटल गोल्ड खरेदी करायचं आहे? पाहा सोपी प्रोसेस

Paytm वरुन डिजिटल गोल्ड खरेदी करायचं आहे? पाहा सोपी प्रोसेस

फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्ड खरेदी करणं सोपं आहे. जर तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Paytm वर चांगला पर्याय आहे.

फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्ड खरेदी करणं सोपं आहे. जर तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Paytm वर चांगला पर्याय आहे.

फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्ड खरेदी करणं सोपं आहे. जर तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Paytm वर चांगला पर्याय आहे.

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : सध्या फिजिकल गोल्डऐवजी डिजिटल गोल्ड खरेदीकडे अनेकांचा कल वाढतो आहे. फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्ड खरेदी करणं सोपं आहे. जर तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Paytm वर चांगला पर्याय आहे. पेटीएमवर गोल्डबॅक ऑफर अंतर्गत पेटीएम गोल्डवर पहिल्यांदा सोनं खरेदीवर 3 टक्के अधिकाधिक 100 रुपयांपर्यंत गोल्डबॅक मिळेल.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधूनच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. याकरता तुम्हाला अधिक खर्चही करावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार सोनंखरेदी करू शकता. डिजिटल गोल्डची सुविधा Amazon Pay, Google Pay, Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या प्लॅटफॉर्मवर उपबल्ध आहे.

पेटीएमवर खरेदी करा डिजिटल गोल्ड -

Paytm App मध्ये होमपेजवर तुम्हाला सर्च बारमध्ये गोल्ड सर्च करावं लागेल. सर्च केल्यानंतर गोल्ड लिहिलेलं दिसेल आणि त्यासोबत एक आयकॉनही असेल. या आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर पेटीएम गोल्ड पेजवर पोहोचाल.

केवळ 1 रुपयात कुठे आणि कसं खरेदी कराल 24 कॅरेट सोने, वाचा सविस्तर

दोन प्रकारे खरेदी करता येईल गोल्ड -

इथे गोल्ड खरेदीसाठीचे दर लिहिलेले दिसतील. या प्लॅटफॉर्मवर दोन प्रकारे सोनं खरेदी करता येईल. यात किंमत टाकून किती रुपयांचं सोनं खरेदी करायचं त्यानुसार सोनं खरेदी करता येईल. तसंच किंमतीच्याऐवजी सोन्याचं वजन टाकून त्या किंमतीचं सोनं खरेदी करता येईल.

असं करा पेमेंट -

किंमत किंवा वजनावरुन गोल्डची निवड केल्यानंतर पेमेंट करावं लागेल. जर तुमच्याकडे प्रोमो कोड असेल, तर पेमेंट करण्याआधी कोड अप्लाय करुन प्रोसेस करा. जेणेकरुन कॅशबॅक किंवा गोल्डबॅक मिळू शकेल. विना प्रोमोकोड पेमेंट केल्यास या बेनिफिटचा फायदा मिळणार नाही.

First published:

Tags: Paytm, Paytm offers, The gold