मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ट्रॅक करतंय तुम्ही कुठे फिरताय ते कोणता VIDEO बघताय या सर्व गोष्टी, कसं कराल डिलीट?

Google ट्रॅक करतंय तुम्ही कुठे फिरताय ते कोणता VIDEO बघताय या सर्व गोष्टी, कसं कराल डिलीट?

गुगल तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटींचा डेटा (Activity Data) कलेक्ट करते. म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता, कोणत्या भागात प्रवास करता, सर्चिंगसाठी कोणते कीवर्ड वापरता इत्यादी गोष्टींचा डाटा गुगल कलेक्ट करते.

गुगल तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटींचा डेटा (Activity Data) कलेक्ट करते. म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता, कोणत्या भागात प्रवास करता, सर्चिंगसाठी कोणते कीवर्ड वापरता इत्यादी गोष्टींचा डाटा गुगल कलेक्ट करते.

गुगल तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटींचा डेटा (Activity Data) कलेक्ट करते. म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता, कोणत्या भागात प्रवास करता, सर्चिंगसाठी कोणते कीवर्ड वापरता इत्यादी गोष्टींचा डाटा गुगल कलेक्ट करते.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: स्मार्टफोन (Smartphone) ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यातच आता बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्यानं साहजिकच स्मार्टफोनचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. इंटरनेट सर्चिंग, ई-मेल आदी गोष्टींसाठी आपण गुगलचा (Google) वापर करतो. गुगल हा शब्द आता इतका प्रचलित झाला आहे, की इंटरनेटचा वापर करण्यालाही लोक गुगल म्हणू लागले आहेत. परंतु, गुगल संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? गुगल तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटींचा डेटा (Google tracking your Activity Data) कलेक्ट करते. म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता, कोणत्या भागात प्रवास करता, सर्चिंगसाठी कोणते कीवर्ड वापरता इत्यादी गोष्टींचा डाटा गुगल कलेक्ट करते.

हा डाटा केवळ क्रोम ब्राउझरवरूनच नाही तर यु-ट्युबसह अन्य प्लॅटफॉर्मवरून जमा केला जातो. मात्र हा डाटा डिलीट करण्याचा ऑप्शनही गुगलने दिला आहे. 2019 मध्ये गुगलने लोकेशन डाटात बदल केले आहेत, त्यानुसार तुम्हाला ऑटोडिलीट कंट्रोलचा (Auto delete Control) पर्यायही दिला गेला आहे. पण याचा वापर नेमका कसा करायचा याबाबत युजर्सला फारशी माहिती नसते. अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही गुगलकडे असलेला तुमचा डाटा डिलीट करू शकता.

हे वाचा-Alert! तुमच्या अकाउंटचा Password यापैकी एक नाही ना? असेल तर लगेच करा बदल

तुम्ही अँड्रॉइड (Android) युजर असाल किंवा अॅपल (Apple) युजर गुगल तुमचा डाटा सेव्ह करत असते. युजर्सला ब्राउजिंगवेळी इंकॉग्निटो मोड (Incognito Mode) नावाचा ऑप्शन दिला जातो. हा ऑप्शन सुरू केल्यावर गुगल तुमचा डाटा स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे गुगलवर तुमचं सर्च रेकॉर्ड आणि सर्च हिस्ट्री (Internet Search History) तयार होत नाही. पण जरी गुगल तुमचा डाटा सेव्ह करू शकला नाही, तरी तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर तुम्ही सर्च केलेल्या वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मची माहिती पाहू शकतो.

तुमचा डाटा गुगलने सेव्ह करू नये यासाठी इंकोग्निटो मोड हा ऑप्शन उत्तम असला तरी तो सारखा वापरता येत नाही. त्यामुळे गुगलकडे असलेला डाटा डिलीट करण्यासाठी अजून एक पर्याय आहे. यासाठी तुमच्या ज्या ब्राउजरचा सर्वाधिक वापर करता, त्यावर जाऊन Google Account या ऑप्शनवर क्लिक करावे. येथे तुम्ही तुमचं गुगल युजर नेम टाइप करावे. त्यानंतर स्क्रिनवर एक मेन्यू बार ओपन होईल. त्यावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. येथे तुम्ही तुमचं नाव, फोटो, जेंडरसारखी वैयक्तिक माहिती एडिट करू शकता. त्यानंतर Go To About Me हा ऑप्शन सिलेक्ट करावा. येथे तुम्हाला People icon, office building icon किंवा Lock icon हे ऑप्शन दिसतील. हे ऑप्शन सिलेक्ट करत तुम्ही ते प्रायव्हेट करू शकता. Lock icon सिलेक्ट केल्यावर तुमचा डाटा प्रायव्हेट होईल. गुगलकडे असलेली हिस्ट्री तपासण्यासाठी तुम्ही History Setting वर जाऊन Web & App Activity मध्ये जाऊन तुमची Google Search History, Youtube History आणि अन्य गुगल अॅप्सची हिस्ट्री पाहू शकता. गुगलकडे तुमचा किती डाटा सेव्ह आहे, हे तुम्ही Data & Privacy या ऑप्शनच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.

हे वाचा-Apple आता घेऊन येतंय इलेक्ट्रिक कार, Sunroof मध्ये असणार भन्नाट फीचर

लोकेशन हिस्ट्री (Location History) डिलीट करण्यासाठी Data & Privacy या ऑप्शनमधल्या History Settings मध्ये जात Location History हा ऑप्शन निवडावा. येथे तुम्ही तुमचा डाटा पाहू आणि डिलीट करू शकता. प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी तुम्ही यु-ट्यूबची हिस्ट्रीही (Youtube History) डिलीट करू शकता. यासाठी हिस्ट्री सेटींगमध्ये जात, यु-ट्यूब हिस्ट्री सिलेक्ट करून ती डिलीट करावी. तसेच तुमचा डाटा सेव्ह होऊ नये, यासाठी तुम्ही टॉगल ऑफ देखील करू शकता.

एखाद्या ठिकाणी प्रवास करताना जेव्हा तुम्ही गुगल मॅपची (Google Map) मदत घेता, तेव्हा तुमच्या लोकेशनची माहिती गुगलकडे सेव्ह होते. युजरला अधिक चांगली सेवा मिळावी, तसेच एकाच ठिकाणी वारंवार जाताना गुगल मॅप सर्च करावं लागू नये हा यामागील उद्देश असतो. पण जर तुम्हाला गुगल मॅपची हिस्ट्री सेव्ह करून ठेवायची नसेल तर तुम्ही इंकोग्निटो मोडचा वापर करू शकता. यामुळे तुमचा डाटा गुगलच्या डाटाबेसमध्ये सेव्ह होणार नाही आणि तुम्हाला सर्च रिझल्टही मिळेल. तसेच डाटाची सर्च हिस्ट्रीही तयार होणार नाही.

First published:

Tags: Apple, Google, History, Privacy, Privacy leak, Tech news, Technology, Youtube