मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple आता घेऊन येतंय इलेक्ट्रिक कार, Sunroof मध्ये असणार भन्नाट फीचर

Apple आता घेऊन येतंय इलेक्ट्रिक कार, Sunroof मध्ये असणार भन्नाट फीचर

प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये वेगळेपण जपणारी अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आता इलेक्ट्रिक कारवर (Electric Car) काम करत आहेत. या कारमध्ये देखील तंत्रज्ञानाचा (Technology) वेगळा अविष्कार पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये वेगळेपण जपणारी अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आता इलेक्ट्रिक कारवर (Electric Car) काम करत आहेत. या कारमध्ये देखील तंत्रज्ञानाचा (Technology) वेगळा अविष्कार पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये वेगळेपण जपणारी अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आता इलेक्ट्रिक कारवर (Electric Car) काम करत आहेत. या कारमध्ये देखील तंत्रज्ञानाचा (Technology) वेगळा अविष्कार पाहायला मिळणार आहे.

  मुंबई, 05 फेब्रुवारी: प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये वेगळेपण जपणारी अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आता इलेक्ट्रिक कारवर (Electric Car) काम करत आहेत. या कारमध्ये देखील तंत्रज्ञानाचा (Technology) वेगळा अविष्कार पाहायला मिळणार आहे. या कारचं सनरूफ (Sunroof) अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे या सनरूफ तंत्रज्ञानाचं पेटंटही (Patent) कंपनीनं मिळवलं असल्याचं समजतं. प्रवासादरम्यान हे सनरूफ गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करता येणार आहे.

  अ‍ॅपल कंपनी सध्या इलेक्ट्रिक कार तयार करण्यासंबंधी काम करत आहे. आतापर्यंत ही बाब अनेक बातम्यांमधून समोर आली आहे. मात्र कंपनीने या प्रोजेक्टविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अ‍ॅपल एका वैशिष्टपूर्ण इलेक्ट्रिक कारवर काम करत असून, त्यात सेल्फ ड्रायव्हिंगसह (Self Driving) अनेक खास फिचर्स असतील, असं या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. आजपर्यंत अ‍ॅपलच्या अनेक तंत्रज्ञानांचं पेटंट त्यांच्याकडे असल्याचं आपल्याला माहीत असेल. परंतु, कंपनीने जे नवीन पेटंट घेतलं आहे ते स्मार्टफोनचं नसून इलेक्ट्रिक कारशी संबंधित आहे. अ‍ॅपलच्या इलेक्ट्रिक कारच्या सनरूफ तंत्रज्ञानाला यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसकडून मंजुरी मिळालेली आहे.

  हे वाचा-WhatsApp Update! आता युजर्स दोन दिवसांनंतरही डिलिट करू शकतील पाठवलेला मेसेज

  या ब्रँडच्या सनरूफ पेटंटनुसार, यात ऑप्टिकल ग्लास (Optical Glass) असेल. कार चालवणारा ड्रायव्हर सनरूफची पारदर्शकता (Transparency) अ‍ॅडजेस्ट करू शकणार आहे. या सनरूफचा वापर कसा करायचा हे आता ड्रायव्हरच्या हातात असणार आहे. याचाच अर्थ या कारमध्ये फक्त सूर्यप्रकाश हवा आहे की ताज्या हवेसाठी संपूर्ण सनरूफ उघडायचं हे आता कारचा ड्रायव्हर ठरवू शकणार आहे. विशेष म्हणजे कारचं हे सनरूफ तुम्ही Apple CarPlay किंवा Siri च्या माध्यमातून वापरू शकणार आहात, असं मीडिया अहवालांमधून समोर आलं आहे. हा ब्रँड अ‍ॅपल कारवर काम करतोय, असे संकेत या पेटंटवरून मिळतात.

  हे वाचा-आता Facebook वरुन घेता येणार Loan, पाहा कोणाला मिळेल फायदा? कसा कराल अर्ज

  बातम्यांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या कार्समध्ये फिक्स्ड सनरूफ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र अ‍ॅपलच्या पेटंटनुसार, या कारमधील सनरूफ हे साईड विंडोजबरोबर उघडणार आहे. अ‍ॅपल कार चालवताना तुम्ही कारचं सनरूफ तुमच्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करू शकणार आहात.

  अ‍ॅपल सेल्फ -ड्रायव्हिंग व्हेईकल सिस्टीमवर (Self Driving Vehicle System) काम करत असल्याचा दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, ही सर्व माहिती खरी असली तरी अॅपल कार बाजारात दाखल होण्यासाठी किमान तीन ते चार वर्षं लागू शकतात.

  एकूणच अ‍ॅपल ही कंपनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी ओळखली जात असल्यानं प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असलेली तसंच खास सनरूफ फीचर असलेली ही अ‍ॅपल कार ग्राहकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरणार हे नक्की.

  First published:
  top videos

   Tags: Apple, Electric vehicles, Iphone, Tech news, Technology