नवी दिल्ली, 24 जून: गुगल क्रोम बाउजरबाबत (Google Chrome Browser) गंभीर बाब समोर आली आहे. गुगलने आठवड्यातून दुसऱ्यांदा अर्जेंट अपग्रेड वॉर्निंग जारी केली आहे. गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 2 बिलियन युजर्स याचा वापर करतात. त्यामुळेच मोठा धोका आहे.
गुगलने Google Chrome सिक्योरिटीमध्ये गंभीर समस्या स्वीकारत युजर्सला ब्राउजर अपग्रेड करण्यासाठी सांगितलं आहे. सिक्योरिटीबाबतच्या समस्या दुरुस्त केल्या जातात. परंतु यावेळी गुगलने ‘Zero-day’ exploit ची बाब स्वीकारली आहे. म्हणजे हॅकर्सला याबाबत माहिती मिळाली आणि या त्रुटीमुळे युजर्सला नुकसान होऊ शकतं. अशाप्रकारे गुगल क्रोममध्ये ही सातवी zero-day vulnerability त्रुटी आहे.
युजर्ससाठी या गोष्टी महत्त्वाच्या -
युजर्सनी Settings > Help > About Google Chrome मध्ये जा. जर तुमचं ब्राउजर वर्जन 91.0.4472.114 किंवा त्याहून वरचं असेल तर असे युजर्स सुरक्षित आहेत. तसंच जर हे वर्जन नसेल, तर ते मॅन्युअली अपडेट करता येईल. अपडेट केल्यानंतर ब्राउजर रिस्टार्ट करा. या त्रुटींमध्ये तीन आणखी हाय लेवल थ्रेट्स सामिल आहेत. त्यामुळे हे अपडेट चेक करणं फायद्याचं ठरेल.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ब्लीपिंग कंप्युटरशी बोलताना सिक्योरिटी जाणकारांनी सांगितलं, की हॅकर्सचा एक नवा ग्रुप सध्या अॅक्टिव्ह आहे आणि ते गुगल क्रोमवर लक्षकेंद्रीत करत आहेत. हे लोक स्वत:ला पजलमेकर म्हणतात आणि यांनी क्रोमच्या झिरो डे बग्सची चेनिंग करत विंडोज सिस्टममध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्याचा मार्ग शोधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.