• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • या कंपन्यातील कर्मचारी सर्वात आनंदी, Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर

या कंपन्यातील कर्मचारी सर्वात आनंदी, Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर

Great Place to Work ही लिस्ट दरवर्षी जाहीर केली जाते. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्व्हे करुन दरवर्षी भारतातील 100 बेस्ट कंपन्यांची निवड केली जाते आणि त्यांना रँक दिला जातो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जून : काम करण्यासाठी भारतात सर्वात बेस्ट कंपनी (Great Place to Work) कोणती आहे? तुमच्यासमोर टाटा, बिर्ला अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांची नावं येतील. पण त्यापैकी कोणतीच कंपनी काम करण्याच्या दृष्टीने भारतातील बेस्ट कंपनी नाही. Great Place to Work ही लिस्ट दरवर्षी जाहीर केली जाते. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्व्हे करुन दरवर्षी भारतातील 100 बेस्ट कंपन्यांची निवड केली जाते आणि त्यांना रँक दिला जातो. ही लिस्ट उद्देशपूर्ण आणि कठीण वर्कप्लेस कल्चरचं मूल्यांकन करुन काढली जाते. DHL Express - DHL Express भारतात काम करण्यासाठी बेस्ट कंपनी असल्याचं या लिस्टमधून समोर आलं आहे. Great Place to Work कडून जारी करण्यात आलेल्या रँकनुसार भारतातील 100 बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर 2021 मध्ये (India’s 100 Best Companies to Work for 2021) या कंपनीने पहिला क्रमांक मिळवला आहे. Mahindra and Mahindra - DHL Express नंतर Great Place to Work या लिस्टमध्ये ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव अँड फार्म इक्विपमेंट सेक्टर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीत जवळपास 20 हजार कर्मचारी काम करतात. ही कंपनी SVUs पासून प्रीमियम लग्जरी यूटिलिटी व्हिकल्स बनवते. भारी कमर्शियल व्हिकल्सपासून थ्री व्हिलरचंही मॅन्यूफॅक्चरिंग केलं जातं. Intuit India - बेस्ट कंपनीच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर Intuit India आहे, जी एक बिजनेस अँड फायनेंशियल सॉफ्टवेअर कंपनी आहे. या लहानशा कंपनीत 1000 लोक काम करतात. ही कंपनी फायनेंशियल, अकाउंटिंग आणि टॅक्सच्या तयारीशी संबंधित सॉफ्टवेअर बनवते आणि विकते. याचे ग्राहक छोटे बिजनेस, अकाउंटेट्स आणि इंडिव्हिज्युअल्सही आहेत.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

  Aye Finance - गुडगावमधील Aye Finance भारतातील सर्वात उत्तम कंपन्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ही एक वित्त कंपनी आहे, जी भारतात MSME सेक्टरमध्ये सूक्ष्म उद्योगांसाठी बिजनेस लोन देते. बँकर्स संजय शर्मा आणि विक्रम जेटली यांनी 2014 मध्ये याची स्थापना केली होती. Synchrony - पाचव्या क्रमांकावर Synchrony कंपनी आहे, जी ग्राहक वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीत जवळपास 4000 लोक काम करतात. ही कंपनी 2020 मध्ये 27व्या नंबरवरुन 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. त्याशिवाय टॉप 10 कंपन्यांमध्ये या कंपन्यांनी आपला आपली जागा मिळवली आहे. 6. Harrisons Malayalam Limited 7. Salesforce 8. Adobe 9. Cisco Systems India 10. Barbeque-Nation Hospitality
  Published by:Karishma
  First published: