Home /News /technology /

केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

तुम्ही एसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली डील आहे. तुम्ही एक ब्राँडेड विंडो (Window AC) एसी केवळ 1400 रुपयांत घरी आणू शकता.

  नवी दिल्ली, 13 मार्च : थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशात स्वत:ला, आपल्या घराला थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. कुलर (Cooler), एसी (AC) मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अनेकजण एसी महाग असल्याने घेणं टाळतात. परंतु तुम्ही एसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली डील आहे. तुम्ही एक ब्राँडेड विंडो (Window AC) एसी केवळ 1400 रुपयांत घरी आणू शकता.

  हे वाचा - उन्हाळ्यात वाढत्या Electricity Bill चे नो टेन्शन, विजेशिवाय चालवा घरातली उपकरणं

  Blue Star विंडो AC तुम्ही स्वस्तात घरी आणू शकता. या 1.5 टन 5 स्टार एसीची बाजारातील किंमत 38,500 रुपये आहे. परंतु Amazon वर 20 टक्के सूटसह हा एसी 30,890 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय हा एसी खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1500 रुपयांची आणखी सूट मिळू शकते. हे सर्व डिस्काउंट मिळाल्यानंतर AC ची किंमत 30,890 रुपयांवरुन 29,390 रुपये होते.

  हे वाचा - उन्हाळ्यात AC हवा आहे पण भरमसाठ वीजबिलाची चिंता? या टिप्स फॉलो करुन वाचवा पैसे

  1400 रुपयांत घरी आणता येईल Blue Star AC - Blue Star 1.5 टन 5 स्टार विंडो AC ईएमआयवर (EMI) घरी आणता येईल. 1400 रुपये प्रति महिना EMI वर एसी खरेदी करता येईल. स्वस्तात, बजेटमध्ये ही डील फायद्याची ठरू शकते.

  हे वाचा - चक्क 400 रुपयांना मिळत आहे AC, कुठे आणि कसं जाणून घ्या?

  काय आहेत फीचर्स - 170 स्क्वेअर फूटसाठी हा Blue Star 1.5 टन 5 स्टार विंडो AC फायद्याचा ठरेल. कॉपर कॉइल, R32 रेफ्रिजरेंट गॅस, एक रिमोट कंट्रोल मिळेल. या एसीला टर्बो कूलिंग सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे रुम लवकर थंड होण्यास मदत होते. तसंच डस्ट फील्टरद्वारे धूळही काढता येते. दरम्यान, विजेचं बिल कमी येण्यासाठी एसी 25 डिग्रीवर सेव्ह करा. टेबल आणि सीलिंग फॅनसाठी 30 पैसे ताशी हिशोबाने खर्च येतो. तर AC 10 रुपये ताशी हिशोबाने चालतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Tech news

  पुढील बातम्या