मुंबई, 12 मार्च- बाजारात एक छोटा आणि दमदार AC विक्रीला आला आहे. तो बाजारातला आतापर्यंतचा सर्वांत छोट्या आकाराचा एअर कंडिशनर आहे. आता आपल्याकडे उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हा छोटा एअर कंडिशनर खूप उपयोगी पडू शकतो. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अनेकांनी नवे सीलिंग पंखे, टेबल फॅन्स, एअर कूलर्स घ्यायला सुरुवात केली असेल. तसंच, ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य असेल, त्यांनी एअर कंडिशनर्स अर्थात एसीही खरेदी केले असतील; मात्र एसी ही सर्वांना परवडण्यासारखी गोष्ट नाही. आता बाजारात आलेला हा पोर्टेबल एसी मात्र सर्वांनाच परवडू शकतो. शिवाय, तुम्ही एका छोट्या पोर्टेबल कूलिंग डिव्हाइसच्या शोधात असल्यासही हा छोटू एअर कंडिशनर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हालाही हा खरेदी करायचा असेल तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती येथे प्रसिद्ध करत आहोत. हे छोटं डिव्हाइस तुमच्या घरी कसं वापरता येईल आणि कसं परिणामकारक ठरेल याचा त्यावरून अंदाज येऊ शकेल. हा आहे Mini Portable AC वर्क टेबल किंवा मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवण्यासाठी एखाद्या कूलिंग डिव्हाइसच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी Mini Portable AC चा पर्याय चांगला ठरेल. हे डिव्हाइस छोटं असून, गारवा देण्याचं काम चांगलं करतं. हे डिव्हाइस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करता येतं. याची किंमत 400 रुपयांपासून सुरू होते. याची प्राइस रेंज 400 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत आहे. हे डिव्हाइस वेगवेगळी डिझाइन्स आणि आकारात उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मॉडेल खरेदी करू शकता, जे तुमच्या गरजा पूर्ण करणारं असेल. हे डिव्हाइस कसं काम करतं? हा पोर्टेबल एअर कंडिशनर (Portable Air Conditioner) वापरायचा असेल, तर याच्यासाठी ड्राय आइसचा वापर करावा लागतो. तुम्ही यासाठी थंड पाण्याचा वापरही करू शकता. त्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल आणि तुम्ही बसलेल्या खोलीतही थंडावा तयार होईल. हा पोर्टेबल एसी वापरणं अगदीच सोपं आहे आणि त्याच्यासाठी विजेचा वापरही अगदी कमी होतो. टेबलवर बसून काम करणाऱ्यांसाठी हा छोटा एसी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होऊन पैशांचीही बचत होईल. मग यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा कमी करण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या पर्यायाच्या शोधात असल्यास हा छोटा आणि स्वस्त असा पोर्टेबल एअर कंडिशनर नक्की खरेदी करा. त्यामुळे तुमचा यंदाचा उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.