मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

उन्हाळ्यात AC हवा आहे पण भरमसाठ वीजबिलाची चिंता? या टिप्स फॉलो करुन वाचवा पैसे

उन्हाळ्यात AC हवा आहे पण भरमसाठ वीजबिलाची चिंता? या टिप्स फॉलो करुन वाचवा पैसे

जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय जर तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून बिलावर नियंत्रण ठेवता येईल.

जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय जर तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून बिलावर नियंत्रण ठेवता येईल.

जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय जर तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून बिलावर नियंत्रण ठेवता येईल.

मुंबई, 12 मार्च: आता हिवाळा संपला असून उन्हाळ्याची (Summer 2022) चाहूल लागली आहे. त्यामुळे लोकांनी एसी (AC), कूलर (Cooler) आणि फॅनची (Fan) साफसफाई करून त्यांचा वापर सुरू केला आहे. काही जणांनी तर नवीन कूलिंग उपकरणांची खरेदी सुरू केली आहे. या कूलिंग उपकरणांमुळे विशेषत: एसीमुळे इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये (Electricity Bill) मोठ्या प्रमाणात वाढ होते. उन्हाळ्यातील चार ते पाच महिने जास्त बिल भरताना आपलं घरखर्चाचं बजेट (Budget) कोलमडू शकतं. म्हणजेच नवीन एसी खरेदी करणं खूप सोपं आहे पण, त्यामुळे येणारं बिल भरणं कठीण आहे. जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय जर तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून बिलावर नियंत्रण ठेवता येईल.

करा 'स्मार्ट' खरेदी

एसीमुळे वाढणारं वीजबील कमी व्हावं, यासाठी काळजीपूर्वक एसी खरेदी केला पाहिजे. 5-स्टार रेटिंग (5 Star Rating AC) असलेला एअर कंडिशनर सर्वात प्रभावीपणे तुमची खोली थंड करतो आणि वीजही कमी प्रमाणात वापरतो. त्यामुळे एसी खरेदी करताना तो 5-स्टार रेटिंगचा आहे की नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. आजकाल स्मार्ट एसीची (Smart AC) चलती आहे. स्मार्ट एसी गारवा आणि वायुप्रवाह यांच्यात परिपूर्ण संतुलन राखतो. स्मार्ट एसी खोलीतील लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो आणि त्यांच्या हालचालींना अनुरूप प्रणाली आपोआप अॅक्टिवेट करतो. कूलिंगच्या गरजा समजून घेण्यासोबतच तो विजेचा वापरही कमी करतो.

हे वाचा-विजेचं बिल खूप येतंय? या Tips करा फॉलो, Bill कमी येण्यास होईल मदत

सर्व्हिसिंग आवश्यक

कोणतंही उपकरण असो त्याचं नियमित सर्व्हिसिंग केलं की, ते चांगल्या प्रकारे काम करतं. एसीलादेखील हा नियम लागू होतो. नियमितपणे सर्व्हिसिंग करत राहिल्यानं एसी चांगल्या स्थितीत राहतो आणि कूलिंगही चांगलं करतो. बाजारात असे काही एसी उपलब्ध आहेत जे वेळोवेळी मशीनमधील धूळ- कचरा आपोआप साफ करतात आणि ताजी, थंड हवा देतात. अशा वैशिष्ट्यामुळे एसी दीर्घ कालावधीसाठी संतुलित थंड हवा देण्यास सक्षम होतात. सर्व्हिसिंगमुळे वारंवार दुरुस्ती खर्च वाचतो आणि एसीचा सर्व्हिस पीरियडही (Service Period) वाढतो. या पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही तुमच्या वीज बिलाची चिंता न करता, घरातच अतिशय आरामदायी आणि थंड वातावरणात राहू शकता.

वापर करताना जपून

काही लोकांचा असा विश्वास आहे की, एअर कंडिशनरचं तापमान (Temperature) जितकं कमी होईल तितकी हवा थंड होईल. पण हे पूर्णपणे बरोबर नाही. शक्य तितक्या लवकर हवा थंड करण्यासाठी लोक अनेकदा एअर कंडिशनरचा अतिरेक (Excessive Use of AC) करताना दिसतात. घरातील वातावरणाचं तापमान वाढताच बहुतेक लोक एसी किमान तापमानावर सेट करतात, जसं की 18 डिग्री सेल्सियस. असं केल्यानं खोली त्वरित थंड होईल, असा त्यांचा समज असतो. मात्र, खोली लवकर थंड करण्याची ही पद्धत प्रभावी नाही. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनुसार (Bureau of Energy Efficiency), एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. हे तापमान मानवी शरीरासाठी योग्य आणि आरामदायक आहे. इतकंच नाही तर संशोधनानुसार एअर कंडिशनरमध्ये वाढलेल्या प्रत्येक डिग्री तापमानामुळे सुमारे सहा टक्के विजेची बचत होते. त्यामुळे वीज बिल कमी करण्यासाठी, एसीचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सियसऐवजी 24 डिग्री सेल्सिअस ठेवा.

हे वाचा-इंटरनेट नसेल तरीही मोबाइलवरून करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

टायमरचा करा वापर

जर तुमच्या एअर कंडिशनरमध्ये टायमरची (Timer) सुविधा असेल आणि त्याचा योग्य वापर केला तर खूप फायदा होईल. एअर कंडिशनर चालू किंवा बंद करण्यासाठी टायमर सेट करता येऊ शकतो. या फीचरमुळे एसी केवळ ऑटोमॅटिकली चालू किंवा बंदच होत नाही तर विजेची बचतदेखील होते.

डोअर लॉक पॉलिसी

वरील सर्व बाबींव्यतिरिक्त 'डोअर लॉक पॉलिसी'चा (Door Lock Policy) अवलंबही फायद्याचा ठरू शकतो. दरवाजे-खिडक्या बंद केल्यानं आणि पडदे लावल्यानं खोलीतील थंडपणा कमी होणार नाही. शिवाय, एसीदेखील लवकर आणि प्रभावीपणे कूलिंगचं काम करेल. खोलीतील गारवा टिकून राहिल्यास एसीची गरज कमी होईल आणि वीज बिलही कमी होईल. एकूणच एअर कंडिशनरचा जबाबदारीनं वापर केल्यास मशीन जास्त काळ सेवा देऊ शकतं आणि वीजबिलातही बचत होऊ शकते.

First published:

Tags: Summer, Summer season