Home /News /technology /

Gmail वर तुम्हालाही असा Mail आला का? सावधान! बँक अकाउंट येऊ शकतं धोक्यात

Gmail वर तुम्हालाही असा Mail आला का? सावधान! बँक अकाउंट येऊ शकतं धोक्यात

सायबर क्राइमच्या संख्येत मोठी वाढ झाली असून वेगवेगळ्या प्रकारे हॅकर्स, स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत. आता फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला असून युजर्सला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

  नवी दिल्ली, 11 डिसेंबर : इंटरनेटमुळे संपूर्ण जग अगदी जवळ आलं आहे. इंटरनेटचे जितके फायदे आहेत, तसं त्याने नुकसानही आहे. मागील काही वर्षांपासून सायबर क्राइमच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारे हॅकर्स, स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत. आता फसवणुकीचा आणखी एक प्रकार Gmail वरुन समोर आला असून युजर्सला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. Gmail वर आलेल्या एका मेसेजने युजर्सला धोका निर्माण होत असून बँक अकाउंट्सदेखील रिकामं होऊ शकतं. Email सिक्युरिटी प्रोव्हाइडरने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2021 पासून युजर्सला एक असा मेल येतो ज्याद्वारे बँक अकाउंटमधून पैसे चोरी करण्याचं काम करतो. युजर्सला DHL सारख्या मोठ्या कंपन्यांच्या नावाने मेल येतात. या मेलमध्ये युजरचं पार्सल डिलीव्हर झालं नसल्याचं सांगितलं जातं आणि त्यासाठी युजरकडे अॅड्रेस आणि काही इतर माहिती मागितली जाते. यासाठी मेलमध्ये एक लिंकही दिली जाते. या लिंकवरुन युजर DHL सारख्या दिसणाऱ्या पोर्टलवर नेलं जातं. असा मेल आल्याने अनेक युजर गोंधळतात. त्यांचं अजून कोणतं पार्सल आलं नाही असा विचार केला जातो. हा मेल हॅकर्ससाठी बँक अकाउंट खाली करण्यासाठीचा, चोरी करण्यासाठीचा मार्ग आहे. हा मेल ओपन करुन अनेक युजर्स त्यातील लिंकवर क्लिक करण्याची चूक करतात. काही जण डिटेल्सही देतात आणि त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

  भारतात 2021 मध्ये सर्वाधिक Google Search केला गेला हा शब्द; तुम्हीही शोधला का?

  अशी घ्या काळजी - मेल ओपन केल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पार्सल डिलीव्हरीबाबत मेल आल्यास सर्वात आधी तो मेल कुठून आला आहे हे तपासणं गरजेचं आहे. तो मेल एखाद्या कंपनीकडून आला असल्यास सेंडरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं नसेल, त्याऐवजी मेलमध्ये Hello सारख्या शब्दांचा वापर केलेला असेल.

  WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन

  कोणत्याही मेलवर घाईगडबडीत उत्तर देऊ नका. सतर्कता बाळगळं आवश्यक असून मेलमध्ये दिलेल्या लिंकवरही क्लिक करू नका.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gmail, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या