जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन

WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन

आता तुमचं Last Seen आणि Online Status हाइड होईल.

आता तुमचं Last Seen आणि Online Status हाइड होईल.

WhatsApp नियम-अटींनुसार या 8 गोष्टी केल्याने तुमचं अकाउंट बॅन करण्यासाठी प्लॅटफॉर्मला ट्रिगर केलं जाऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : WhatsApp ने ऑक्टोबर 2021 मध्ये भारतात 20 लाखहून अधिक अकाउंट बॅन केले. याआधीही अटी-नियमांचं उल्लंघन केल्यानं 30.27 लाखहून अधिक भारतीय अकाउंट बॅन करण्यात आले होते. भारतात नवे IT नियम अनिवार्य आहेत. त्यानुसार WhatsApp मासिक रिपोर्ट पब्लिश करतं, यात चुकीची माहिती, फेक न्यूज पसरवण्यासह अनेक कारणांसह या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जातात. WhatsApp चे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. परंतु तरीही युजर्स काहीही शेअर करू शकत नाही, कारण WhatsApp अनेक मेटा डेटा ट्रॅक करतो. WhatsApp ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर जर एखाद्या युजरने कंपनीच्या Terms of Service चं उल्लंघन केलं, तर ते अकाउंट बॅन केलं जाईल, असं म्हटलं आहे. WhatsApp नियम-अटींनुसार या 8 गोष्टी केल्याने तुमचं अकाउंट बॅन करण्यासाठी प्लॅटफॉर्मला ट्रिगर केलं जाऊ शकतं. त्याशिवाय WhatsApp काही गुन्ह्यात पोलिसांना कारवाईसाठी युजरचा मेटा डेटाही देऊ शकतं.

चुकून Delete झाले महत्त्वाचे WhatsApp Chats? परत मिळवण्यासाठी पाहा सोपा पर्याय

- जर तुम्ही एखाद्याचं फेक अकाउंट बनवलं, तर WhatsApp तुमचं अकाउंट बॅन करू शकतं. - जर एखादा व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि त्या व्यक्तीला तुमच्याकडून अनेक मेसेज पाठवले जात असतील, तर तुमचं WhatsApp अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. - जर युजर थर्ड पार्टी App WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus चा वापर करत असेल, तर WhatsApp तुम्हाला बॅन करू शकतं. - एखाद्याला अनेकांनी ब्लॉक केलं असेल, तर WhatsApp कडून त्याला बॅन केलं जाऊ शकतं. - अनेकांनी तुमच्या WhatsApp अकाउंट विरोधात रिपोर्ट केलं असेल, तर तुमच्यावर बॅन लागू शकतो. - मालवेयर किंवा फिशिंग लिंक पाठवल्यासही WhatsApp कडून बॅन केलं जाऊ शकतं.

WhatsApp ने बॅन केली 22 लाखहून अधिक Accounts, चुकूनही करू नका या गोष्टी

- WhatsApp वर अश्लील क्लिप, धमकी मानहानी करणारे मेसेज पाठवू नका. - WhatsApp वर हिंसेला प्रोत्साहन देणारे फेक मेसेज किंवा व्हिडीओ पाठवू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात