नवी दिल्ली, 21 जानेवारी : क्रिप्टोकरेन्सीनंतर
(Cryptocurrency) एनएफटी
(NFT) सर्वाधिक चर्चेत आहे. भारतातही NFT बाबत अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोक NFT हे भविष्यात फायदेशीर असल्याचं म्हणत आहेत, तर काहींचं हा फुगा असून लवकरच फुटेल असं म्हणणं आहे. सलमान खानसह इतरही अनेक बॉलिवूड कलाकारांनी NFT आणण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय फेसबुक
(Facebook), आता असलेल्या मेटानेही
(Meta) आपल्या प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर
(Instagram) NFT फीचर आणण्याची तयारी दर्शवली आहे.
फायनेंशियल टाइम्स
(Financial Times) च्या रिपोर्टनुसार, मेटा आपल्या दोन Facebook आणि Instagram प्लॅटफॉर्मवर NFT तयार करुन, शोकेस करुन आणि त्याच्या विक्रीसाठी एक फीचर आणण्याची तयारी करत आहे.
रिपोर्टनुसार, फेसबुकचा हा प्लॅन सध्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. कधीही यात मोठे बदल केले जाऊ शकतात. Financial Times च्या रिपोर्टनुसार, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची टीम एका अशा फीचरची तयारी करत आहेत, ज्याअंतर्गत युजर्स आपल्या प्रोफाइल फोटोमध्ये NFT डिस्प्ले करू शकतील.
फेसबुकवर NFT बनवण्यासाठीचं फीचर दिलं जाईल. त्याशिवाय कंपनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह NFT मार्केट प्लेसदेखील आणण्याच्या तयारीत आहे, जिथे NFT ची खरेदी केली जाईल. इन्स्टाग्राम प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी NFT एक्स्प्लोर करत असून हे अधिकाधिक लोकांसाठी कसं अॅक्सेसिबल केलं जाईल हेदेखील एक्स्प्लोर केलं जात आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये NFT फीचर आल्यास, युजर्ससाठी ही बाब फायदेशीर ठरू शकते, असं म्हटलं जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामचा रीच अधिक असून अधिकाधिक लोक आपल्या गोष्टींसाठी NFT करुन पैसे कमावू शकतात. हे फीचर कधीपर्यंत येईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहे NFT?
NFT नॉन फंजिबल टोकेन
(Non-fungible token) अर्थात एक प्रकारचं डिजीटल टोकेन आहे. NFT ब्लॉकचेनवर
(Blockchain) आधारित आहे. ब्लॉकचेन एक टेक्नोलॉजी असून यावर क्रिप्टोकरेन्सी बेस्ड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.