Home /News /technology /

बाईक-स्कूटर घेण्याचा विचार करताय? Budget 2022-23 आधी जाणून घ्या ही महत्त्वाची बाब

बाईक-स्कूटर घेण्याचा विचार करताय? Budget 2022-23 आधी जाणून घ्या ही महत्त्वाची बाब

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनची (FADA) मागणी केंद्र सरकारने मान्य केली, तर बजेटनंतर टू-व्हीलरच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 19 जानेवारी : देशाचा अर्थसंकल्प लवकरच (Budget 2022) जाहीर होणार आहे. प्रत्येक लहान-मोठ्या व्यावसायिकाला बजेटमध्ये सरकार आपल्यासाठी काही दिलासा देईल अशी आशा असते. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना बजेटमध्ये सुविधा आणि सवलतींची अपेक्षा आहे. ऑटो सेक्टरमध्ये (Auto Sector) टू-व्हीलर (Two Wheeler) इंडस्ट्रीलादेखील याचीच अपेक्षा आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनची (FADA) मागणी केंद्र सरकारने मान्य केली, तर बजेटनंतर टू-व्हीलरच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑटो डिलर्स संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (FADA) Two Wheeler वर GST दर 28 टक्क्यांनी कमी करुन 18 टक्के करण्याची मागणी केली आहे, जेणेकरुन मागणीत वाढ होऊ शकेल. FADA ने टू-व्हीलर हे लक्जरी प्रोडक्ट (Luxury Product) नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जीएसटी (GST) दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बिजनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, FADA ने टू-व्हीलर ही चैनीची वस्तू म्हणून वापरली जात नसल्याचं म्हटलं आहे. सर्वसामान्य दैनंदिन कामासाठी, ऑफिसला जाण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे 28 टक्के जीएसटी जो लक्जरी प्रोडक्टवर लावला जातो, तो टू-व्हीलरसाठी लावणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  हे वाचा - Traffic Rule: Car Driving वेळी फोनवर बोलताना नाही लागणार दंड, पण...काय आहे नियम

  जीएसटी कमी झाल्यास कच्च्या मालाच्या वाढीमुळे टू-व्हीलर किंमतीत होणारी वाढ कमी होण्यास मदत होईल. तसंच टू-व्हीलरची मागणी वाढेल. यामुळे टू-व्हीलर इंडस्ट्रीला, ऑटो सेक्टरला कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, असंही फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (FADA) म्हटंल आहे.

  हे वाचा - सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

  अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 साठी बजेट सादर करणार आहेत. त्याआधी ऑटो डिलर्स संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने अर्थ मंत्रालयाकडे (Finance Ministry) टू-व्हीलरवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्याची मागणी केली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bike riding, Budget, GST

  पुढील बातम्या