नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : भारतात Facebook सर्वाधिक पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात Facebook App चे 300 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. फेसबुकची खास बाब म्हणजे यातून मनोरंजनासह छोटे व्यवसायदेखील विकसित करण्यास मदत होते. सुरक्षेच्यादृष्टीनेही फेसबुकमध्ये प्रोफाइल लॉक, लोकेशन डेटा यासारख्या अनेक सुविधा दिल्या जातात. फेसबुकच्या प्रोफाइल लॉक फीचरद्वारे तुमचं प्रोफाइल सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
काय आहे Facebook Profile Lock Feature -
Facebook Profile Lock Feature द्वारे तुम्ही तुमचं अकाउंट आणि प्रोफाइल फोटो लॉक करू शकतात. या फीचरमुळे तुमचं प्रोफाइल सुरक्षित राहण्यास मदत होते. जे लोक तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये नाहीत, ते तुमचं प्रोफाइल पाहू शकत नाहीत. त्याशिवाय तुमचा प्रोफाइल फोटो फुल स्क्रिनवरही पाहू शकत नाहीत. तसंच Timeline देखील पाहू शकत नाही.
प्रोफाइल लॉक फीचरद्वारे पर्सनल डेटा सुरक्षित राहील. कोणीही तुमचा फोटो किंवा कंटेंट चोरी करू शकत नाही. युजरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल आयडीदेखील सुरक्षित राहतील. तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये नसलेले लोक तुमचं प्रोफाइल पाहू शकत नाहीत.
असं लॉक करा तुमचं Facebook Profile -
- सर्वात आधी Facebook App ओपन करा आणि Profile वर क्लिक करा.
- त्यानंतर Edit Profile पर्यायाच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- इथे एक Lock Profile पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
- त्यानंतर एक पेज दिसेल, ज्यात फेसबुक प्रोफाइल लॉक फीचरचे फायदे काय आहेत ते सांगितलेलं असेल.
- शेवटी तुमचं अकाउंट लॉक करण्यासाठी Lock Your Profile पर्यायावर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.