मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp Payment साठी आता Identity Verification गरजेचं; होणार मोठा बदल

WhatsApp Payment साठी आता Identity Verification गरजेचं; होणार मोठा बदल

WhatsApp कंपनीने युजर्सला सुलभपणे पेमेंट करता यावं यासाठी Identity Verification चं फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता युजर्सला सुरक्षितपणे पेमेंट करता येईल असा अंदाज लावला जात आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सतत इतर पेमेंट्स कंपन्यांच्या स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी अ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल करत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपने Identity Verification चं फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. भारतातल्या इतर (United Payments Interface) ऑनलाइन पेमेंट कंपन्या युजर्सला Identity Verification करायला लावत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 2020 मध्ये पेमेंट सेवेची सुरूवात केली होती. त्यानंतर जून 2021 मध्ये भारतात ही सेवा सर्वांसाठी व्हॉट्सअ‍ॅपने लागू केली होती.  त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपला पेमेंटला पेटीएम, फोन पे, गूगल-पे आणि अॅमेझॉन पे च्या स्पर्धेचा सामना करावा लागला होता. आता त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने  Identity Verification आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युजर्सला हे अ‍ॅप (WhatsApp Payment) वापरण्यापूर्वी Identity Verification करावं लागणार आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपची ही पेमेंट  सुविधा भारत आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. भारतात फक्त बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि डेबिट कार्डद्वारे या अ‍ॅपवर पेमेंट करता येते. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये युजर्सला फेसबुक आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत आहे.

Drugs And Bollywood:ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंतWhatsApp Chat

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की (Whatsapp v2.21.22.6)  च्या बीटा सॉफ्टवेयरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे हे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन (whatsapp payment feature) त्याच युजर्ससाठी असेल जे व्यावयसायीक कारणांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार आहेत. त्यामुळे युझर्सला सुरक्षितपणे (Identity Verification is now required for WhatsApp Payment) पेमेंट करता येईल असा अंदाज लावला जात आहे.   त्याचबरोबर आता व्हॉट्सअ‍ॅप ही सेवा काही इतर देशांमध्येही सुरू करण्याच्या तयारीत आहे.

WhatsAppवर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? ग्रुप न बनवता करता येईल काम

दरम्यान भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App असून चॅटिंगपासून ते अनेक ऑफिशियल कामांसाठी याचा वापर केला जातो. परंतु काही स्मार्टफोन युजर्सला 1 नोव्हेंबरपासून आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये (WhatsApp will be discontinued in this smartphone from 1st November) व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Techonology, WhatsApp features, Whatsapp News, Whatsapp pay