लंडन, 15 एप्रिल : ज्यावेळी फेसबुक (Facebook) लाँच झालं होतं, त्यावेळी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ लोकांना एकत्र आणण्याचं, लोकांना जोडण्याचं काम करत होता. परंतु सध्या फेसबुक अनेक फेक न्यूज (Fake News) आणि भडकाऊ, आक्षेपार्ह पोस्टसाठी चर्चेत आलं आहे. जर तुम्हीही गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह पोस्टमुळे समस्येत आहात, तर आता काळजी करायची गरज नाही. आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह पोस्टबाबत तक्रार करता येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता तक्रारीची सुनावणी फेसबुक नाही, तर एक स्वतंत्र बोर्ड करेल.
स्वतंत्र देखरेख बोर्डाने मंगळवारी घोषणा केली की, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या (Instagram) युजर्सकडून मिळणाऱ्या तक्रारींचा ते स्वीकार करतील, ज्यांनी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर हानीकारक, आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. हे बोर्ड पोस्ट सामग्री, स्टेटस अपडेट, कमेंट आणि शेअर कटेंटचं पुनरावलोकन करेल.
(वाचा -
तुमचं WhatsApp Account कोणीही बंद करू शकतं; रिसर्चरचा खळबळजनक दावा)
फेसबुकला या बोर्डाने दिलेला निर्णय मान्य करावा लागेल. या 20 सदस्यीय देखरेख बोर्डाची गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली होती. जानेवारीमध्ये या बोर्डने फेसबुकसाठी कंटेंट मॉडरेशनमध्ये सुधारणांसाठी 6 प्रकरणांच्या आधारे 17 शिफारशी केल्या होत्या.
(वाचा -
UIDAI ने सांगितला Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय; असा लॉक करा आधार नंबर)
या बोर्डचे संचालक थॉमस ह्यूजेस यांनी सांगितलं की, युजर्सला फेसबुककडून आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यासाठी अपील करण्यास सक्षम बनवणं हा या देखरेख बोर्डाच्या क्षमतांचा महत्त्वपूर्ण विस्तार आहे. येणाऱ्या काही आठवड्यात हे बोर्ड Reference ID जारी करेल. ID प्राप्त युजर औपचारिकरित्या स्वतंत्र पुनरावलोकनसाठी अपील करू शकतात. हे बोर्ड मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी काम करतं. आतापर्यंत बोर्डाकडे 3000000 हून अधिक युजर्सने अपील केलं असून आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.