मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook वर उगाच होतोय टाईमपास? वेळ वाचवण्यासाठी हे भन्नाट फीचर ठरेल फायद्याचं

Facebook वर उगाच होतोय टाईमपास? वेळ वाचवण्यासाठी हे भन्नाट फीचर ठरेल फायद्याचं

अनेक युजर्स फेसबुकवर तासनतास वेळ घालवतात. फेसबुकवर उगाच वेळ गेल्यानंतर अनेकांना याची खंतही वाटते. पण आता युजर्सला फेसबुकवर होणाऱ्या टाईमपासला आळा घालता येऊ शकतो.

अनेक युजर्स फेसबुकवर तासनतास वेळ घालवतात. फेसबुकवर उगाच वेळ गेल्यानंतर अनेकांना याची खंतही वाटते. पण आता युजर्सला फेसबुकवर होणाऱ्या टाईमपासला आळा घालता येऊ शकतो.

अनेक युजर्स फेसबुकवर तासनतास वेळ घालवतात. फेसबुकवर उगाच वेळ गेल्यानंतर अनेकांना याची खंतही वाटते. पण आता युजर्सला फेसबुकवर होणाऱ्या टाईमपासला आळा घालता येऊ शकतो.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : युजर्सकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुकचा (Facebook Feature) वापर करणाऱ्या युजर्सची संख्या लक्षणीय आहे. अनेक युजर्स फेसबुकवर तासनतास वेळ घालवतात. फेसबुकवर उगाच वेळ गेल्यानंतर अनेकांना याची खंतही वाटते. पण आता युजर्सला फेसबुकवर होणाऱ्या टाईमपासला आळा घालता येऊ शकतो. त्यासाठी Quiet Mode या फीचरमार्फत (facebook time limit setting) अमूल्य वेळ वाचवता येईल.

काय आहे फीचर?

फेसबुकच्या या फीचरचं Quiet Mode नाव आहे. ही सेटिंगला ऑन केल्यानंतर फेसबुकवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स बंद होतात. त्यामुळे युजर्स जर कोणतं काम करत असेल, तर तो (how to use facebook quiet mode) डिस्टर्ब होणार नाही. त्याचबरोबर युजर्सला या फीचरच्या माध्यमातून Facebook Quiet Mode चा टाईमही सेट करता येतो. या फीचरचा फायदा त्या युजर्सलाही आहे जे दररोज काही वेळासाठी फेसबुक  वापरतात.

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

अनेकदा जरा वेळासाठीच फेसबुक ओपन करू असं ठरवलं जातं, पण एकदा ओपन केल्यानंतर त्यावर युजर्सचा बराच वेळ निघून जातो. त्यामुळे आता त्यासाठी युजरला फेसबुकवर टाईम लिमिट रिमाइंडर सेट (How to activate facebook quiet mode) करता येणार आहे. एकदा सेट केलेला टाईम संपल्यानंतर फेसबुकमार्फत युजरला मेसेजेस येतात. त्याचबरोबर या फीचरच्या माध्यमातून युजरने फेसबुकवर काय काय केलं आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी किती वेळ दिलेला आहे, हे देखील समजतं.

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

Facebook Quiet Mode चा असा करा वापर -

सर्वात आधी युजरला आपलं फेसबुक अकाउंट ओपन करावं लागेल. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. यावेळी तुम्हाला खाली Setting and Privacy चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यानंतर समोर आलेल्या पर्यायांमधून Your Time on Facebook चा ऑप्शन निवडा. त्यानंतर Manage Your Time वर क्लिक करून Quiet Mode वर क्लिक केल्यानंतर हे फीचर ऑन होईल.

Samsung च्या 'या' लोकप्रिय सीरिजचं उत्पादन होणार बंद? काय आहे कारण

या फीचरसाठी टाईम सेट करायचा असेल, तर त्यासाठी Schedule Quiet Mode च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर वेळ आणि तारखेची माहिती भरा. त्यानंतर त्याच पेजवर युजर्सला See Time चा ऑप्शन दिसेल. त्याद्वारे युजरने फेसबुकवर कोणत्या गोष्टींसाठी किती वेळ दिलेला आहे हे समजेल. Quiet Mode च्या पर्यायाखाली युजर्सला Daily Time Reminder चा पर्यायही मिळेल. त्याद्वारे युजरला फेसबुकचा जेवढा वेळ वापर करायचा आहे ते सेट करता येईल आणि सेट केलेला वेळ संपल्यानंतर युजर्सला फेसबुकद्वारे अलर्ट देण्यात येईल.

First published:

Tags: Facebook, Privacy, TIME PASS