मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

आता केवळ बोलण्यासाठीच नाही, तर शॉपिंग, बँकिंग, ऑनलाइन पेमेंट अशा अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची ठरते.

आता केवळ बोलण्यासाठीच नाही, तर शॉपिंग, बँकिंग, ऑनलाइन पेमेंट अशा अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची ठरते.

आता केवळ बोलण्यासाठीच नाही, तर शॉपिंग, बँकिंग, ऑनलाइन पेमेंट अशा अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची ठरते.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : जवळपास सर्वच लोकांसाठी Smartphone अतिशय गरजेची गोष्ट झाला आहे. स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरपासून अनलॉकपर्यंत अनेक फीचर्स दिले जातात. आता केवळ बोलण्यासाठीच नाही, तर शॉपिंग, बँकिंग, ऑनलाइन पेमेंट अशा अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची ठरते. तुमचा स्मार्टफोन चुकीच्या हातात गेल्यास, काही मिनिटांत मोठं नुकसान होऊ शकतं.

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतील -

- Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी फोन लॉक करणं सर्वात सोपा पर्याय आहे. सर्व फोनमध्ये लॉक करण्यासाठी फीचर दिले जातात. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर किंवा फेस अनलॉक फीचर नसल्यास, पिन किंवा पॅटर्नद्वारे फोन लॉक करा. फोन हरवला किंवा चोरी झाला तर फोन अनलॉक करण्यास वेळ लागेल. तोपर्यंत युजर बँक अकाउंट ब्लॉक करू शकतात.

- अँटी वायरस सॉफ्टवेअरचा वापर करुन तुम्ही Android फोनची सुरक्षा करू शकता. यामुळे फोनमधील मालवेअर किंवा बग ओळखण्यास मदत होऊ शकते. यासाठी अँटीवायरस सॉफ्टवेयर Avast Mobile Security & Antivirus आणि Norton Mobile Security चा पर्याय निवडू शकता. यामुळे फोन सिक्योर ठेवण्यास मदत होईल.

- फोनमध्ये अनेक कामांसाठी अनेक Apps डाउनलोड केले जातात. परंतु Apps डाउनलोड करताना, Google Play store सारख्या विश्वसनीय सोर्सेसद्वारेच Apps डाउनलोड करा. चुकूनही फोनमध्ये थर्ड पार्टी वेबसाइटद्वारे Apps डाउनलोड करू नका.

- आपल्या फोनमध्ये अनेक जण पासवर्ड सेव्ह करतात. दररोज एखाद्या App चा वापर करावा लागत असल्याने ID-Password सेव्ह केला जातो. परंतु असं करणं धोक्याचं ठरू शकतं. यामुळे फोन चुकीच्या हातात गेल्यास, कोणीही तुमच्या अकाउंटमध्ये लॉगइन करू शकतं. त्यामुळे पासवर्ड सेव्ह न करणं फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Security, Smartphone, Tech news