मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

PAN Card वर लावलेला फोटो आणि सही चुकीची असल्यास त्यात बदल करता येतो. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : PAN Card अर्थात Permanent Account Number मध्ये 10 अंकी एक यूनिक अल्फान्यूमरिक कोड असतो. याच्या मदतीने कोणत्याही भारतीय नागरिकाच्या फायनेंशियल हिस्ट्रीचा रेकॉर्ड ठेवता येतो. पॅन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. त्यामुळेच पॅन कार्डमध्ये दिलेली माहिती योग्य असणं गरजेचं आहे. पॅन कार्डचा उपयोग फोटो आणि स्वाक्षरी वेरिफाय करण्यासाठी केला जातो. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या पॅन कार्डवर फोटो आणि सही योग्य असणं महत्त्वाचं ठरतं.

Aadhaar Card मध्ये असा अपडेट करा Address, पाहा सोपी प्रोसेस

PAN Card वर लावलेला फोटो आणि सही चुकीची असल्यास त्यात बदल करता येतो. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- PAN Card वरील फोटो बदलण्यासाठी सर्वात आधी NDLS च्या वेबसाइटवर जावं लागेल.

- इथे दोन पर्याय Apply Online आणि Registered Users दिसतील.

- यात Application Type वर क्लिक करुन सिलेक्ट करा. इथे नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करायचा आहे की पॅन कार्डमध्ये बदल करायचे आहेत ते सिलेक्ट करा.

- बदल करण्यासाठी Changes or Correction in the existing PAN Data च्या पर्यायावर क्लिक करा.

- त्यानंतर कॅटेगरीमध्ये Individual सिलेक्ट करा.

- इथे मागितलेले सर्व डिटेल्स भरा. त्यानंतर Captcha Code टाकून Submit वर क्लिक करा.

- आता KYC ऑप्शनवर सिलेक्ट करा.

- त्यानंतर Photo Mismatch आणि Signature Mismatch असे दोन पर्याय येतील.

- फोटो बदलायचा असेल तर Photo Mismatch वर क्लिक करा.

- आता आई-वडिलांची सर्व माहिती भरुन Next वर क्लिक करा.

- संपूर्ण माहिती भरल्यानंतर ओळखपत्रासह काही कागदपत्र जोडावी लागतील.

- त्यानंतर Declaration वर टिक करुन Submit वर क्लिक करा.

भारतात फोटो आणि सही बदलण्यासाठी GST सह 101 रुपये फी असून भारताबाहेरील पत्त्यासाठी 1011 रुपये फी आहे. संपूर्ण प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 15 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. त्यानंतर अर्ज केल्याची प्रिंट इन्कम टॅक्स पॅन सर्विस यूनिटकडे पाठवावी लागेल. तुमचा अर्ज Acknowledgment Number द्वारे ट्रॅक केला जाऊ शकतो.

First published: