नवी दिल्ली, 4 मार्च : भारतात हळूहळू इलेक्ट्रिक वाहन
(Electric Vehicle) खरेदीकडे अनेक ग्राहकांचा कल आहे. परंतु याचाच फायदा घेत फ्रॉडस्टर्सकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या डिस्ट्रीब्यूटर्स आणि ग्राहकांना टार्गेट करत गुगल अॅडद्वारे
(Google Ad) फिशिंग
(Phishing Website) होत आहे. आतापर्यंत याद्वारे चार ते आठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे.
IANS च्या माहितीनुसार, सिक्योरिटी फर्म क्लाउडसेकने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. यात Google Add चा वापर करुन ग्राहकांकडून फेक वेबसाइटवर इलेक्ट्रिक वाहन बुकिंग आणि डाउन पेमेंट
(Electric Vehicle Booking and Down payment) म्हणून दोन ते चार लाख रुपये घेतले जात होते.
फसवणूक करणारे Google Ad द्वारे ग्राहकांना फिशिंग साइट अर्थात फेक वेबसाइटवर घेऊन जात होते. फसवणूक करणारे एखाद्या खऱ्या वेबसाइटप्रमाणेच कंपनीच्या नावाने फेक अगदी तशीच दिसणारी वेबसाइट तयार करत होते, त्याचं मिळतं-जुळतं डोमेन नेम रजिस्टर करत होते आणि गुगल अॅड देत होते.
ग्राहक या Google Ad वर ज्यावेळी क्लिक करतो, त्यावेळी त्यांना फिशिंग अर्थात फेक तयार केलेल्या डोमेनवर नेलं जातं. या वेबसाइट खऱ्या वेबसाइटप्रमाणेच अगदी सेम दिसतात. त्यामुळे ग्राहकांना ही साइट खोटी असल्याचा कोणताही संशय येत नाही. अशा वेबसाइट खऱ्या वेबसाइट सारखेच फोटो आणि इतर माहिती देतात.
सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन वाहनांना पीआयएल योजनेच्या
(PIL Scheme) कक्षेत आणण्याची घोषणा केली होती. या फेक वेबसाइटमुळे ग्राहकांचं आर्थिक नुकसान तर होतंच, शिवाय त्यांची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्सही शेअर होतात ज्यामुळे फ्रॉडचा धोका अधिकच वाढतो.
या फेक वेबसाइटमुळे, फिशिंग फ्रॉडमुळे इलेक्ट्रिक कंपन्यांच्या व्यवसायाचं थेट नुकसान होत असून त्यांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हताही धोक्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही इलेक्ट्रिक गाडी ऑनलाइन बुक करताना त्याची वेबसाइट योग्यरित्या तपासणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा मोठा फटका बसू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.