मुंबई, 3 मार्च : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापरासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. व्यावसायिक वापरासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच वैयक्तीक वापरासाठीही लोकांचा कलदेखील आता पेट्रोल-डिझेलच्या गाडीऐवजी इलेक्ट्रिक कार (Electric Car), इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) यांच्या खरेदीकडे दिसू लागलाय. आज आम्ही तुम्हाला हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) कंपनीच्या अशा एका स्कूटरची माहिती देणार आहोत, जी चालवण्यासाठी तुम्हाला दुचाकीच्या रजिस्ट्रेशनची गरज नाही. तसेच, ड्रायव्हिंग लायसन्सचीदेखील गरज पडणार नाही. हीरो इलेक्ट्रिकने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एडी (Hero Eddy) लाँच केली आहे. ही स्कूटर दिसायला अतिशय आकर्षक आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 72,000 रुपये आहे. पिवळ्या आणि निळ्या या दोन रंगात ही स्कूटर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 4.5 लाख युनिट्सची विक्री हीरो इलेक्ट्रिक भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्पेसमधील एक प्रमुख कंपनी आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली आहे की, ग्राहकांची वाढती मागणी लक्षता घेता लुधियाना येथील आपल्या प्लांटमधील उत्पादन क्षमता वाढवत आहे. कंपनीचे देशभरात 750 पेक्षा अधिक विक्री आणि सर्व्हिस पॉइंट्स आहेत. तसंच, ग्राहकांना चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीदेखील कंपनी काम करत आहे कंपनी गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहे. आतापर्यंत देशात हीरो इलेक्ट्रिक कंपनीने विविध इलेक्ट्रॉनिक मॉडेलच्या जवळपास 4.5 लाख युनिट्सची विक्री केली आहे. वाचा :
नवी Car-Bike खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा झटका, पुन्हा एकदा वाढणार दर; हे आहे कारण विविध फीचर्स हीरो एडी ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तिचा वेग 25 किमी/ तास आहे. ही स्कूटर कमी अंतर कव्हर करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. ज्यात फाइंड माय बाईक, ई-लॉक, मोठी बूट स्पेस, फॉलो मी हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड यांचा समावेश आहे. या स्कूटरचा वापर बाजारातून सामान आणण्यासाठी, जिममध्ये जाण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी अशा विविध कामांसाठी होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात छोट्या कामांसाठी ही स्कूटर सर्वोत्तम ठरेल. तिथं रस्त्यांवर फारशी गर्दीही नसते त्यामुळे ही स्कूटर वापरली तर पेट्रोलचा खर्चही वाचेल आणि कामंही होतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता हळूहळू ई-वाहनांच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी हीरोची एडी ही स्कूटर एक चांगला पर्याय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.