मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /युजर्स स्वत:च करु शकणार फेक न्यूजची ओळख; Google ने शेअर केल्या खास टिप्स

युजर्स स्वत:च करु शकणार फेक न्यूजची ओळख; Google ने शेअर केल्या खास टिप्स

फेक बातम्या आणि अफवांवर बंदी घालण्यासाठी गुगलने काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्याद्वारे युजर्स कोणत्याही फेक न्यूजचा (Fake News) स्वत:च तपास करू शकतात.

फेक बातम्या आणि अफवांवर बंदी घालण्यासाठी गुगलने काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्याद्वारे युजर्स कोणत्याही फेक न्यूजचा (Fake News) स्वत:च तपास करू शकतात.

फेक बातम्या आणि अफवांवर बंदी घालण्यासाठी गुगलने काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्याद्वारे युजर्स कोणत्याही फेक न्यूजचा (Fake News) स्वत:च तपास करू शकतात.

नवी दिल्ली, 5 एप्रिल : आजकाल गुगल (Google) आणि सोशल मीडियावर (Social Media) अफवा, फेक न्यूजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फेक बातम्या आणि अफवांवर बंदी घालण्यासाठी गुगलने काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्याद्वारे युजर्स कोणत्याही फेक न्यूजचा (Fake News) स्वत:च तपास करू शकतात.

आता केवळ रिसर्चर्सच नाही, तर युजर्सही स्वत:च फेक न्यूजची ओळख करू शकतात.

न्यूज कव्हरेज -

एखाद्या न्यूज आउटलेट्सने घटनेचा काय आणि कसा रिपोर्ट केला हे तपासणं गरजेचं आहे. यासाठी न्यूज मोडवर किंवा news.google.com मध्ये ज्या विषयाची माहिती हवी आहे तो विषय सर्च करा. जर ऑप्शन उपलब्ध असेल, तर 'Full Coverage' वर क्लिक करुन योग्य ती माहिती चेक करता येऊ शकते.

फोटो ऑथेंटिंक आहे का नाही हे तपासा -

असे अनेक फोटो असतात जे व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर फॉरवर्ड केले जातात. काही फोटो प्रत्यक्षात नसतातही. Google ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स एखाद्या फोटोवर राईट क्लिक करुन किंवा Search Google for Image सिलेक्ट करुन येथे फोटो ऑथेंटिंक आहे की नाही याची तपासणी करू शकतात. मोबाईल युजर्स काही वेळासाठी इमेजला टच आणि होल्ड करुनही असं करू शकतात.

(वाचा - WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक)

गुगल मॅप्स -

जर एखादा फोटो खरोखरचं त्या घटनेच्या ठिकाणचा आहे की नाही हे तपासायचं असल्यास, Google Maps च्या मदतीने त्या फोटोची जागा Earth View किंवा Street View चेक करुन तपासता येऊ शकते.

(वाचा - डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक)

फॅक्ट चेकर्स -

फॅक्ट चेक एक्सप्लोररमध्ये एखादा संबंधीत विषय सर्च करण्याचा प्रयत्न करा, जो जगभरातील नामांकित प्रकाशकांकडून (reputable publishers)100000 हून अधिक फॅक्ट चेकची तपासणी एकत्रित करतो.

First published:

Tags: Fake news, Google, Social media