मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक, कोर्टाने असा दिला निर्णय

डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक, कोर्टाने असा दिला निर्णय

एअरटेलने चार दिवस रोमिंगमध्ये फोन वापरण्याबाबत जवळपास 13 कोटींचं बिल पाठवलं. ते पाहून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. यातून बरं झाल्यानंतर तो एअरटेलविरोधात कोर्टात पोहचला. पाहा कोर्टाने काय दिला निर्णय...

एअरटेलने चार दिवस रोमिंगमध्ये फोन वापरण्याबाबत जवळपास 13 कोटींचं बिल पाठवलं. ते पाहून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. यातून बरं झाल्यानंतर तो एअरटेलविरोधात कोर्टात पोहचला. पाहा कोर्टाने काय दिला निर्णय...

एअरटेलने चार दिवस रोमिंगमध्ये फोन वापरण्याबाबत जवळपास 13 कोटींचं बिल पाठवलं. ते पाहून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. यातून बरं झाल्यानंतर तो एअरटेलविरोधात कोर्टात पोहचला. पाहा कोर्टाने काय दिला निर्णय...

नवी दिल्ली, 4 एप्रिल : एअरटेलने बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला इतकं बिल पाठवलं की बिल पाहून त्याला अटॅकच आला. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या मेल्विन जॉन थॉमसला एअरटेलने चार दिवस रोमिंगमध्ये फोन वापरण्याबाबत जवळपास 13 कोटींचं बिल पाठवलं. ते पाहून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. यातून बरं झाल्यानंतर तो एअरटेलविरोधात कोर्टात पोहचला.

मेल्विन बंगळुरूमध्ये एका कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर काम करतो. कामासाठी त्याला 2016 मध्ये चीनमध्ये जावं लागलं होतं. कॉर्पोरेट अकाउंट अंतर्गत त्याच्याकडे एअरटेलचं सिम होतं. ट्रिपवर जाण्यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये त्याने एअरटेलला काही वेळासाठी वॉईस कॉलसाठी इंटरनॅशनल रोमिंग अ‍ॅक्टिवेट करण्यासाठी कॉल केला होता. त्यानंतर ही सुविधा मिळाली, परंतु मेल्विनने दावा केला की, इंटरनॅशनल रोमिंग आणि डेटा प्लॅनबाबत टेक्स्ट मेसेजद्वारे एअरटेलकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

12 लाखांहून अधिक बिल -

एअरटेलकडून त्याला 12,14,566 रुपये बिल आलं, ज्यात 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2016 पर्यंतच चीन प्रवासाचं बिलही सामील होतं. मेल्विनने दावा केला की, SMS द्वारे बिल आल्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर यातून बरं झाल्यानंतर त्यांने एअरटेलच्या रिप्रेजेंटेटिव्हसह ऑथेंटिसिटीबाबत चौकशी केली. त्यानंतर सर्विस प्रोव्हाईडरने त्याला 12,18,732 रुपयांचं रिवाईज्ड बिल पाठवलं.

कंपनीने दिला डेटा यूजचा हवाला -

मेल्विनचा प्लॅन लिमिट 9100 रुपये होता आणि हे बिल पाहण्यासाठी त्याने कंपनीकडे डेटा यूजेसबाबत माहिती मागितली. चीन ट्रीप दरम्यान, तो संपूर्ण Wifi चा वापर करत होता, असा दावा एअरटेलने केला.

कोर्टात धाव -

हे प्रकरण सोडवता न आल्याने मेल्विनने 12 डिसेंबर 2016 मध्ये भारती एअरटेल लिमिटेडविरोधात बेंगळुरूच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगात तक्रार केली. सुनावणीदरम्यान मेल्विनच्या वकिलांनी आपला दावा सादर केला. त्यानंतर एअरटेलच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, तक्रारदाराने वापरलेलं सिम हे कॉर्पोरेट प्लॅनचा भाग असून ते त्यांच्या कर्मचाऱ्याचं आहे. तसंच एअरटेलच्या वकिलांनी सांगितलं की, मेल्विनने आपल्या डेटा प्लॅनला अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये तसंच ठेवलं होतं, त्यामुळेच अधिक डेटाचा वापर झाल्यामुळे 12,18,732 बिल पाठवण्यात आलं. त्यानंतर ते रिवाईज्ड करुन 5,22,407 रुपये करुन पाठवण्यात आलं. तसंच एअरटेलच्या वकिलांनी हार्ट अटॅकची कहाणीही खोटी असल्याचं म्हटलं.

(वाचा - गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी नो टेन्शन; WhatsApp वर असा बुक करा LPG Gas Cylinder)

कोर्टाने सुनावला हा निर्णय -

त्यानंतर कंज्युमर फोरमने एअरटेलकडून मेल्विनच्या अपर लिमिटबाबत सवाल केला, जो 9,100 रुपयांचा होता. तसंच नियमानुसार, एअरटेलला त्यांच्या ग्राहकांना 70 टक्क्यांपर्यंत डेटा यूजनंतर याबाबतची माहिती SMS द्वारे दिली गेली पाहिजे होती असंही सांगितलं. एअरटेलने 12,18,732 रुपयांचं बिल कमी करुन ते 5,22,407 रुपये केलं, जे आधीच्या बिलाच्या 60 टक्के कमी आहे. बिल अशाप्रकारे कसं कमी केलं जाऊ शकतं, असा सवाल करत, कोर्टाने हे मोठं बिल केवळ ग्राहकाकडून पैसे घेण्यासाठीच केलं असल्याचं म्हटलं.

5 मार्च 2021 रोजी कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, एअरटेलने ग्राहकाकडून 5,22,407 रुपये किंवा कोणतीही रक्कम न वसूल करण्याचे आदेश दिले. तसंच कोर्टाने या ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून 5000 रुपये आणि कोर्टाच्या खर्चासाठी 5000 रुपये देण्याचा निर्णय दिला आहे.

First published:

Tags: Airtel, Tech news