नवी दिल्ली, 8 जानेवारी : भारतात इंटरनेट युजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा अशाप्रकारच्या स्कॅममध्ये फसवणूक झाल्याने लोकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर जाणून घेण्यासाठी युजर्स तो Google वर सर्च करतात आणि तो डायलही करतात. परंतु अनेकदा गुगलवर सर्च केला गेलेला कस्टमर केअर नंबरचा पहिला रिझल्ट खोटा असू शकतो, जो फसवणूक करणाऱ्यांकडून ऑपरेट केला जातो. या नंबरवर फोन केल्यानंतर काही वेळातच कस्टमरच्या अकाउंटमधून पैसे गायब होतात. अशा घटना सतत पाहायला मिळत आहेत.
कस्टमर केअर फ्रॉडमध्ये, रिमोट कंट्रोलवाले अॅप सर्वाधिक धोकादायक ठरतात. फ्रॉड करणारे कोणताही फ्रॉड करताना, मोबाईल युजरला त्यांच्या अँड्रॉईड फोनमध्ये रिमोट डेक्सटॉप अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगतात.
सायबर क्राईम करणारे मेसेजद्वारे लोकांना एक लिंक पाठवतात आणि रिमोट एक्सेसवालं एखादं अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगतात. परंतु लोकांना याबाबत जराही कल्पना नसते की, अॅप डाउनलोड केल्यानंतर, फोनचा संपूर्ण एक्सेस फ्रॉड करणाऱ्यांकडे जातो. त्यानंतर फ्रॉड करणारे फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरू करतात. त्यानंतर UPI लॉगइन करताना फोनमध्ये आलेला ओटीपी ते पाहतात.
फोनमध्ये हे app कधीही डाउनलोड करू नका -
1. TeamViewer QuickSupport
2. Microsoft Remote desktop
3. AnyDesk Remote Control
4. AirDroid: Remote access and File
5. AirMirror: Remote support and Remote control devices
6. Chrome Remote Desktop
7. Splashtop Personal- Remote Desktop
रिमोट कंट्रोल app मालवेअर अॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile app