नवी दिल्ली, 9 जानेवारी : व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) नव्या नियम आणि अटींनी युजर्ससमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. नव्या अटींमध्ये युजर्समध्ये भीतीचं वातावरण असून ते दुसऱ्या पर्यायांच्या शोधात आहेत, ज्यात त्यांच्या प्रायव्हसीला कोणताही धोका निर्माण होणार नाही. याच दरम्यान आता, सिग्नल मेसेंजरला (signal massenger)जगभरात पसंती मिळते आहे.
मागील दोन दिवसांपासून युजर्सची संख्या वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर वेरिफिकेशन कोड उशिरा येतो आहे. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सला जोडण्यासाठी एक गाईडलाईन जारी केली आहे, जी दुसऱ्या मेसेंजर अॅपवरून सिग्नलवर मूव्ह करण्यासाठी स्टेप्स सांगत आहे.
WhatsApp ची नवी पॉलिसी -
WhatsApp कडून बुधवारपासून युजर्सला पॉप-अप मेसेज पाठवण्यात आले आहेत. यात युजर्सला नियम आणि अटींसह नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगण्यात आलं आहे. नवे नियम 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी त्याने सांगितलेल्या नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील, अन्यथा युजर्सचं अकाउंट डिलीट केलं जाईल.
टेस्ला सीईओचं सिग्नलशी जोडण्याचं आवाहन -
व्हॉट्सअॅपच्या या घोषणेनंतर युजर्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या इतर मेसेंजर अॅपवर जाण्यासाठी तयार होत आहेत. यासंदर्भात टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी गुरुवारी, युजर्सला सिग्नलशी जोडण्याचं आवाहन केलं आहे.
सिग्नल पर्सनल डेटा न मागता केवळ फोन नंबर स्टोअर करतो -
सिग्नलने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या लेटेस्ट वर्जनसह ग्रुप कॉल लाँच केला आहे आणि त्याला एन्क्रिप्टेड दिलं आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ फोन नंबर स्टोअर करतो. तर टेलिग्राम पर्सनल डेटा म्हणून केवळ कॉन्टॅक्ट इंफो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर ID मागतो.
Verification codes are currently delayed across several providers because so many new people are trying to join Signal right now (we can barely register our excitement). We are working with carriers to resolve this as quickly as possible. Hang in there.
— Signal (@signalapp) January 7, 2021
A lot of people have been asking how to move their group chats from other apps to Signal, and Signal group links are a great way to get started. Drop a group link into your former chat app of choice like you're dropping the mic on the way out. pic.twitter.com/q49DeZufBG
— Signal (@signalapp) January 7, 2021
सिग्नलच्या नव्या युजर्ससाठी गाईडलाईन जारी -
गुरुवारी सिग्नलने ट्विट करुन अनेक प्रोव्हाडर्सकडे वेरिफिकेशन कोड उशिरा येत आहेत, कारण अनेक लोक या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीने एक गाईडलाईन जारी केली आहे, जी युजर्सला इतर अॅपकडून सिग्नल जॉईन करण्याबाबत सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, Whatsapp chat