नवी दिल्ली, 19 जानेवारी : गुगल (Google) प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. अनेक गोष्टींची माहिती Google वर सर्च करुन मिळवता येते. पण काही गोष्टी गुगल सर्च (Google Search) करणं महागात पडू शकतं. काही गोष्टी सर्च करणं नुकसानकारक ठरू शकतं, हॅकर्सकडूम मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे गुगलवर चुकूनही असं सर्च करू नका.
डॉक्टर -
अनेकदा लोक Google लाच डॉक्टर मानतात आणि कोणत्याही आजारासाठी गुगलवर औषधं (Medicine Google Search) सर्च करतात. अनेक जण आजारासंबंधी लक्षणं गुगलवर टाकून त्याबाबतची औषधं सर्च करतात. परंतु असं चुकूनही करू नका. यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या आजाराबाबत गुगलवर माहिती घेणं चुकीचं नाही. परंतु Google वर कोणत्याही एखाद्या वेबसाइटवर पाहून इलाज करणं, औषधं घेणं नुकसानकारक ठरू शकतं.
बँकिंग माहिती -
कोरोना काळत ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये (Online Transaction) मोठी वाढ झाली आहे. याचे फायदे-नुकसानही आहे. ऑनलाइन फ्रॉड करणारे हॅकर्स बँकेप्रमाणे URL तयार करतात. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही एखाद्या बँकेचं नाव टाकता त्यावेळी फेक URL मध्ये अडकता. त्यामुळे बँकेची माहिती Google Search करू नका. ऑफिशियल वेबसाइटवरुनच माहिती घेणं फायद्याचं ठरतं.
कस्टमर केअर -
अनेकदा लोक कोणत्याही कस्टमर केअरचा नंबर (Customer Care Number) गुगलवर सर्च करतात. यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. हॅकर्स कंपनीची नकली वेबसाइट बनवून त्याचा नंबर आणि ईमेल आयडी गुगलवर टाकतात आणि युजरही आपली माहिती त्या साइटवर देतात. त्याद्वारेच अकाउंटमध्ये फ्रॉडच्या घटना होतात. त्यामुळे कोणताही कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च न करता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन घ्यावा.
सरकारी योजना -
केंद्र सरकार डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देत सर्व योजनांची माहिती इंटरनेटवर दिली जाते. या योजनांची (Government Scheme) आपली स्वत:ची वेबसाइट असते. इथूनच संबंधित योजनांविषयीची माहिती मिळवता येते. सायबर क्रिमिनल्स फ्रॉड सरकारी वेबसाइट तयार करतात आणि लोकांची फसवणूक केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.