सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महिलाही इंटरनेट वापरात मागे नाहीत. नोकरी करणारी असो, गृहिणी असो किंवा विद्यार्थीनी बहुतेक महिला, तरुणी गुगलवर काही ना काही सर्च करतात. (फोटो सौजन्य - Shutterstock)
2/ 9
महिला गुगलवर नेमकं असं काय सर्च करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता काही पुरुषांना असते. विशेषतः आपली गर्लफ्रेंड किंवा बायको नेमकं गुगलवर काय शोधते यात पुरुषांना रस असतो.
3/ 9
नुकतंच गुगलने आपला सर्च रिझल्टचा एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात महिला नेमकं गुगलवर काय सर्च करतात या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महिलांच्या गुगल सर्चबाबत बऱ्याच इंटरेस्टिंग बाबी समोर आल्या आहेत.
4/ 9
देशात एकूण 15 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात त्यात जवळपास 6 कोटी महिला आहेत. इंटरनेट वापरणाऱ्या महिलांमध्ये सर्वाधिक महिला या 15 ते 34 वयोगटातील आहेत. (फोटो सौजन्य - Shutterstock)
5/ 9
रिपोर्टनुसार महिलांना लहानपणापासून करिअरबाबत खूप गंभीर असतात. त्यामुळे कोणता कोर्स करावा, कोणतं करिअर निवडावं, याबाबतची माहिती सर्च करतात.
6/ 9
ऑनलाईन खरेदीकडेही महिलांचा जास्त कल असतो. इंटरनेटवर त्या कपड्यांचे डिझाइन्स, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबाबत सर्च करतात.
7/ 9
बहुतेक महिला आपल्या सौंदर्याची खूप काळजी घेतात. त्यामुळे फॅशन, ब्युटी ट्रिटमेंट्स, घरगुती उपाय याबाबत सर्च करायला त्यांना जास्त आवडतं.
8/ 9
इतकंच नव्हे तर गुगलवर महिला मेहंदीच्या लेटेस्ट डिझाइन्सही सर्च करतात.
9/ 9
महिलांना रोमँटिक गाणी ऐकायला खूप आवडतं. त्यामुळे इंटरनेटवर म्युझिक सर्चमध्ये त्या रोमँटिक गाणी शोधतात आणि ती ऐकतात.