जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, थेट तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका

Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, थेट तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका

Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, थेट तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका

गुगलवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, थेट तुरूंगातही पोहचवू शकतं. तसंच मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे काही गोष्टी गुगलवर अजिबात सर्च करू नयेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जून: गुगलचा (Google) सर्वाधिक सर्च करण्यासाठी वापर केला जातो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर, रस्ता, कोणत्याही गोष्टीची माहिती गुगलवर मिळते. पण सर्च करण्यापूर्वी तुम्ही काय सर्च करताय, याचा कधी विचार करता का? गुगलवर काहीही सर्च करण्यापूर्वी जाणून घ्या काय सर्च करावं आणि काय नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्या Google Search केल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. गुगलवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, थेट तुरूंगातही पोहचवू शकतं. तसंच मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे काही गोष्टी गुगलवर अजिबात सर्च करू नयेत. तुमचं नाव - गुगलवर कधीही स्वत:ची ओळख पाहण्यासाठी सर्च करू नका. गुगलकडे तुमच्या सर्च हिस्ट्रीचा संपूर्ण डेटा असतो आणि सतत सर्च केल्याने ही बाब लीक होण्याचा धोका असतो. हॅकर्स याच शोधात असतात, की कोणती गोष्ट त्यांना सहजपणे हॅक करण्यासाठी मिळेल. ई-मेल आयडी - अनेकदा काही लोक आपला ई-मेल आयडी गुगलवर सर्च करतात. परंतु असं करणं त्रासदायक ठरू शकतं. स्वत:चा ई-मेल आयडी सर्च केल्याने तुमचं अकाउंट लीक होऊ शकतं. तसंच पासवर्डही लीक होऊ शकतो. युजर एखाद्या स्पॅममध्येही अडकण्याचा धोका निर्माण होतो.

(वाचा -  Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस )

औषधं - काही जण घरातील सदस्य किंवा स्वत:ही आजारी असल्यास गुगलवर त्यासंबंधी औषध किंवा त्यावरील उपचार सर्च करतात. परंतु गुगलवर याबाबत अचूक माहिती मिळत नाही. अशा प्रकारे मिळालेल्या माहितीची गॅरेंटीही नसते. त्यामुळे आजारी असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा. आजाराबाबत गुगल सर्च करू नका.

(वाचा -  Google काही सेकंदात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? जाणून घ्या यामागे काय असते प्रोसेस )

कस्टमर केअर नंबर - डिजीटल पेमेंटमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉड प्रकरणातही वाढ होत आहे. सायबर फ्रॉडमध्ये कस्टमर केअर अधिकारी बनून फसवणूक करणं हा सध्या सर्वात पॉप्युलर प्रकार आहे. फ्रॉडस्टर्स गुगलवर बँकांचे चुकीचे कस्टमर केअर नंबर टाकतात आणि मदतीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे कधी Customer Care नंबर गुगलवर सर्च करू नका. बँक किंवा इतर पेमेंट सर्विसचा कस्टमर केअर नंबर त्यांच्या वेबसाईट किंवा अॅपवर तपासा.

(वाचा -  Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक )

चाईल्ड पॉर्न, बॉम्ब बनवणं - काही लोक गुगलवर अशाही गोष्टी सर्च करतात, ज्या सर्च करणं चांगलंच महागात पडू शकतं. सायबर सेलच्या नजरेतून असं सर्च करणारे युजर्स वाचू शकत नाही. चाईल्ड पॉर्न, बॉम्ब बनवणं अशा गोष्टी सर्च केल्यानंतर त्या अलर्ट मोडमध्ये जातात. यामुळे कारवाई झाल्यास थेट जेलमध्ये जावं लागू शकतं. कूपन कोड - मागील अनेक दिवसांत कूपन कोड फ्रॉड समोर आले आहेत. लोकांना लिंक पाठवून किंवा इतर पद्धतींनी कूपनद्वारे कॅशबॅक जिंकण्याची ऑफर दिली जाते. अशात अनेक जण गुगलवर कूपन सर्च करतात. यात गुगलवर अनेक बनावट वेबसाईट मिळतात, ज्याद्वारे फ्रॉड केला जाऊ शकतो. त्यामुळे फ्री कूपन, कूपन कोड वेबसाईटच्या फंदात पडू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात