नवी दिल्ली, 21 डिसेंबर : सध्याच्या डिजीटल काळात अनेक जण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर Google Search करतात. कित्येक जण आजारांपासून ते रेसिपीपर्यंत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगलचा वापर करतात. Google कडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. Google वर सांगितलेल्या गोष्टी काही वेळा बरोबर, तर काही वेळा चुकीच्याही असू शकतात. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करताना विचार करुन सर्च करा, अन्यथा जेलमध्येही जावं लागू शकतं. अशा काही गोष्टी सर्च केल्याने तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता.
बॉम्ब बनवण्याची पद्धत -
अनेकदा एखाद्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसताना त्या गोष्टीबाबत सर्च केलं जातं. जसं बॉम्ब बनवण्याची पद्धत कोणी सर्च केली तर युजर अडचणीत येऊ शकतो. या चुकीच्या सर्चवर सायबर सेलची नजर असते. सुरक्षा एजेन्सीज तुमच्या विरोधात कारवाई करू शकतात. त्यामुळे जेलमध्येही जावं लागू शकतं.
प्रायव्हेट फोटो-व्हीडीओ -
सोशल मीडियावर, गुगलवर प्रायव्हेट फोटो-व्हीडीओ लीक करणंही गंभीर गुन्हा आहे. यासाठी जेलमध्येही जावं लागू शकतं.
Child Porn -
भारत सरकारचे चाइल्ड पॉर्नोग्राफीविरोधात नियम अतिशय कठोर आहेत. गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करणं किंवा पाहणं, शेअर करणं हा गुन्हा आहे. यासंबंधी कायद्याचं उल्लंघन केल्यास जेलची हवा खावी लागू शकते.
फिल्म पायरसी -
चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तो ऑनलाइन लीक करणं हा गुन्हा समजला जातो. जर तुम्ही ऑनलाइन लीक करत असाल, तर हा गुन्हा असून भारत सरकारच्या या कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 वर्ष जेल आणि 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
गर्भपात -
गुगलवर गर्भपात करण्याच्या पद्धती सर्च करणंही गुन्हा आहे. त्यामुळे ही गोष्ट गुगलवर चुकूनही सर्च करू नका. भारतीय कायद्यानुसार, डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भपात केला जाऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.