नवी दिल्ली, 18 जानेवारी : तुम्ही Google Chrome ब्राउजरचा वापर करता का? ब्राउजर अपडेट करण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन आलं आहे का? जर नोटिफिकेशन आलं असेल, तर लगेच ते पेज बंद करा आणि चुकूनही डाउनलोड बटणावर क्लिक करू नका. सध्या एक नवा रॅनसमवेयर (Ransomware) म्हणजेच एक प्रकारचा मालवेयर वेबसाइट्सद्वारे (Malware) पसरत आहे.
या मॅलिशियस मालवेयरमुळे (Malicious Malware) तुमच्या कंप्यूटरचा संपूर्ण डेटा तुमच्या कामाचा राहत नाही. रॅनसम म्हणजे मागितलेली रक्कम भरल्यानंतरच तुम्हाला तुमचा डेटा परत मिळेल. सध्या मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजरवर (Microsoft-edge Browser) ही समस्या येत आहे.
जीबी हॅकर्स डॉट कॉमच्या (GBhackers.com) रिपोर्टनुसार, मॅग्निबर रॅनसमवेयर (Magniber Ransomware) पुन्हा आला आहे. याआधी हा इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउजरद्वारे लोकांची फसवणूक करत होता. परंतु अटॅकर्स आता मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft-edge) आणि गुगल क्रोमचा (Google Chrome) या कामासाठी वापर करत आहेत. हा रॅनसमवेयर आताही आधीप्रमाणेच काम करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मालवेयर फेक वेब पेजेसद्वारे क्रोम किंवा एज ब्राउजरच्या नव्या अपडेटच्या नावाने पाठवला जातो. युजर जर अपडेट क्रोम किंवा अपडेट एज बटणावर क्लिक करत असतील, तर पेज .appx टाइपचं ब्राउजर एक्सटेंशन डाउनलोड करतो. हे इन्स्टॉल केल्यानंतर प्रोग्राम बॅकग्राउंडमध्ये चालू लागतो.
या इन्स्टॉलनंतर Malicious Files आपल्या विंडो स्क्रिनवर बॅकग्राउंडमध्ये एनक्रिप्ट होऊ लागतात. परंतु युजरला याबाबत जराही माहिती मिळत नाही. हे एन्क्रिप्शन एकदा पूर्ण झालं, की तुमच्या समोर नोटपॅटवर एक रॅनसम नोट येते. या नोटमध्ये जोपर्यंत तुम्ही रॅनसम भरणार नाही, तोपर्यंत तुमच्या कंप्यूटरवरील कोणतीही फाइल एक्सेस करू शकणार नाही.
असा करा बचाव?
अशा प्रकारच्या रॅनसमवेयरपासून वाचण्यासाठी काही सावधगिरी बाळगळं गरजेचं आहे. कोणत्याही अनोळखी वेबसाइटवरुन तुमच्या क्रोम किंवा एज ब्राउजरवर अपडेट पॅकेज डाउनलोड करू नका. क्रोम आणि एज आपोआप आपल्या सर्वरवरुन अपडेट होऊ शकतात. त्यामुळे मॅन्युअल अपडेटची कोणतीही गरज नाही.
टेक एक्सपर्ट्सनुसार, फ्रॉडस्टर्स, हॅकर्स फेक पेजद्वारे अपडेट डाउनलोड बाबत सांगून सर्वसामान्यांची फसवणूक करतात. आपल्या डेटाचा नेहमी क्लाउड स्टोरेज किंवा फिजिटकल एक्सटर्नल स्टोरेजवर बॅकअप ठेवा. जर तुमचा कंप्यूटर चुकून इन्फेक्टेड झाला, तर अशास्थितीत रीसेट करुन डेटा बॅकअप मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.