नवी दिल्ली, 17 जानेवारी : कोरोना काळात अनेकांनी आपला अधिकतर वेळ स्मार्टफोन आणि लॅपटॉप घालवला आहे. अशात सायबर क्रिमिनल्सने याचा फायदा घेतला असून सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकेसंबंधी फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सायबर क्रिमिनल्स बँक फ्रॉड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. लोकांची फसवणूक करुन काही मिनिटांत त्यांचं अकाउंट खाली करत आहेत. यापैकी एक प्रकार Vishing आहे. याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत.
काय आहे विशिंग (Vishing) -
विशिंग फ्रॉडमध्ये सायबर क्रिमिनल्स एका फोन कॉलवर व्यक्तीकडून खासगी आणि वैयक्तिक माहिती मिळवतात. या डिटेल्समध्ये यूजर आयडी, लॉगइन आणि ट्रान्झेक्शन पासवर्ड, ओटीपी, कार्ड पीन, सीवीवी, यूआरएन, जन्मतारीख, आईचं नाव अशी माहिती मिळवतात. सायबर क्रिमिनल्स बँकेकडून बोलत असल्याचं सांगतात आणि ग्राहकांकडून फोनवर वित्तीय आणि पर्सनल माहिती काढतात. त्यानंतर या डिटेल्सचा वापर ग्राहकाच्या कोणत्याही परवानगीशिवाय फसवणुकीसाठी केला जातो.
या सेफ्टी टिप्स फॉलो करा -
- बँकेकडे तुमचे काही खासगी डिटेल्स असतात. जर एखाद्याने फोनवर बँकेचा व्यक्ती असल्यास सांगून डिटेल्स मागण्याचा प्रयत्न केल्यास सावध व्हा. कोणतीही माहिती न देता बँकेकडे या कॉलबाबत माहिती द्या.
- कोणतीही बँक कॉल करुन ग्राहकांचे डिटेल्स मागत नाही. त्यामुळे बँकेच्या नावाने, बँकेचा व्यक्ती बोलत असल्याचं सांगून कोणी डिटेल्स मागत असल्यास ते देऊ नका.
- कोणत्याही टेलिफोन सिस्टमवर पर्सनल किंवा अकाउंट डिटेल्स शेअर करू नका. ईमेल, SMS वरही डिटेल्स देऊ नका.
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्सची माहिती कॉल, मेसेजवर कोणत्याही व्यक्तीला देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Financial fraud, Tech news