मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! या 5 Apps मुळे रात्रीच्या झोपेवर होतोय भयंकर परिणाम, तुम्हीही या लिस्टमध्ये नाही ना?

Alert! या 5 Apps मुळे रात्रीच्या झोपेवर होतोय भयंकर परिणाम, तुम्हीही या लिस्टमध्ये नाही ना?

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

स्लीप जंकीच्या एका सर्व्हे रिपोर्टमध्ये रात्रीच्या वेळी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Apps बाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या Apps मुळे 78 टक्के युजर्सच्या झोपेवर परिणाम होत आहे.

नवी दिल्ली, 17 जानेवारी : भारतात सोशल मीडिया Apps चा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोट्यवधी लोक सोशल मीडिया Apps चा वापर करतात. स्लीप जंकीच्या एका सर्व्हे रिपोर्टमध्ये रात्रीच्या वेळी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Apps बाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये अशा 5 Apps बाबत सांगण्यात आलं आहे, ज्यांनी लोकांची झोप उडवली आहे. या Apps मुळे 78 टक्के युजर्सच्या झोपेवर परिणाम होत आहे. या झोप उडवणाऱ्या Apps मध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर चीनी App TikTok आहे. या App मुळे लोकांवर सर्वाधिक परिणाम होत असून युजर्सला सर्वाधिक नुकसानही होत आहे.

TikTok नंतर Instagram, Snapchat, Twitter आणि Facebook सामिल आहे. त्याशिवाय Pinterest, YouTube, Reddit आणि Tumblr सामिल आहेत. बिछान्यावर संपूर्ण रात्र मोबाइल स्क्रोल केल्याने झोपवर अतिशय वाइट परिणाम होतो, झोप येत नाही आणि सतत झोप मोड होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे वाचा - Stock Marketमध्ये ट्रेडिंग करणं होईल सोपं,या Mobile Appवर मिळतील Investment Tips

सर्वाधिक वापरले जातात हे Apps -

सर्वात पहिल्या क्रमांक YouTube चा आहे. 85.8 टक्के लोक याचा वापर करतात. तर 75.7 टक्के लोक Facebook चा वापर सर्वाधिक करतात.

त्यानंतर Instagram 70.6 टक्के आणि Twitter वर 50.6 टक्के लोक अ‍ॅक्टिव्ह असतात.

Facebook वर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स -

Facebook 60 कोटी अ‍ॅक्टिव्ह युजर्ससह सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया App आहे. रिपोर्टनुसार, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्यानंतर स्मार्टफोनवर सतत अ‍ॅक्टिव्ह राहण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. सरासरी एक दिवसांत 5 तास 24 मिनिटांपर्यंत एक युजर्स स्मार्टफोनवर अ‍ॅक्टिव्ह असतो. यात 92 मिनिटं सोशल मीडियावर व्हिडीओ पाहले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

असा होतोय परिणाम -

- रात्रभर सोशल मीडियाचा वापर केल्याने सकाळी उठताना उशीर होतो. झोप पूर्ण होत नाही.

- दिवसभर थकवा आणि डोकेदुखीची समस्या येते.

- रात्रभर सोशल मीडियाचा वापर केल्याचा याचा कामावरही परिणाम होतोना दिसतो आहे.

- त्याशिवाय डोळ्यांना जडपणासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत.

हे वाचा - कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

देशात एकूण 62.4 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. ज्यात 44.8 कोटी युजर्स सोशल मीडियाचा वापर करतात. 2021 मध्ये भारतात सोशल मीडियाचा वापर 31 टक्क्यांनी वाढला आहे. तर 2021 मध्ये इंटरनेट युजर्समध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

First published:

Tags: Apps, Smartphone, Tech news