नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतात इंटरनेट युजर्ससोबत सध्या कस्टमर केअर स्कॅम्सचं प्रमाण वाढतं आहे. अनेक जण कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी गुगल सर्च करतात आणि गुगलवर असलेला नंबर खरा समजून त्यावर कॉल करतात. पण गुगलवर दिलेला कस्टमर केअर नंबर खोटा, फसवणूक करण्यासाठीचा असू शकतो. त्यावर फोन केल्यानंतर कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्ह बोलत असल्याचं सांगत, हॅकर्सकडून काही अॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले जातात आणि त्यातूनच मोठ्या फसवणूकीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे फोनमध्ये काही अॅप्स, अनोळखी किंवा एखाद्याने सांगितल्यावर डाउनलोड करू नका.
खरा कस्टमर केअरचा व्यक्ती, कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्ह अशाप्रकारे कोणतेही अॅप्स डाउनलोड करण्यासाठी कधीही सांगत नाही. त्यामुळे कोणीही असे अॅप्स डाउनलोड करण्यास सांगितल्यास सावध व्हा. या अॅप्सच्या मदतीने फसवणूक, फ्रॉड करणारे ओटीपी चोरी करून व्यक्तीचं अकाउंट खाली करू शकतात.
TeamViewer QuickSupport -
हे अॅप आयटी मॅनेजर्स फोन किंवा पीसी कंट्रोल करण्यासाठी वापर करतात. हे कामाचं अॅप आहे. परंतु फ्रॉड करणारे स्कॅमर्स याचाच वापर करून तुमचा फोन कंट्रोल करतात. फोनमधील डेटा चोरी करतात. या अॅपमुळे स्कॅमर्स ओटीपी, बँक डिटेल्स चोरी करू शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने, कस्टमर केअरमधून बोलत असल्याचं सांगत, हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितल्यास सावध राहा.
Microsoft Remote desktop -
हे अॅप युजर्सला पीसी रिमोटली कनेक्ट करण्याचं काम करतं. हेदेखील TeamViewer QuickSupport प्रमाणे काम करतं. हेदेखील महत्त्वाचं अॅप आहे. परंतु हॅकर्स याच अॅपच्या मदतीने युजर्सचा फोन हॅक करतात.
AnyDesk Remote Control -
हे अॅप डेक्सटॉप रिमोटली ऍक्सेस देतं. परंतु हॅकर्स, स्कॅमर्स याचाच वापर करुन अनेकांची फसवणूक करतात.
AirDroid -
हे रिमोट ऍक्सेस अॅप आहे. ज्याचा अँड्रॉईड फोनमध्ये वापर केला जातो. याबद्दल माहिती नसल्यास किंवा कोणीही डाउनलोड करण्यास सांगितल्यास हे अॅप डाउनलोड करू नका.
AirMirror -
हे अॅप पीसीद्वारे फोन ऍक्सेस करण्याची सुविधा देतं. हॅकर्स या अॅपचा वापर करुन फोन हॅक करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone