Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कसं शक्य आहे? 12000 फूट उंचावरुन पडलेला iPhone आढळला चालू स्थितीत, VIDEO VIRAL

कसं शक्य आहे? 12000 फूट उंचावरुन पडलेला iPhone आढळला चालू स्थितीत, VIDEO VIRAL

फोन जवळ नसल्याचं समजताच त्याने ‘Find my iphone’ च्या मदतीने आपला फोन शोधला. फोन मिळाला आणि तो चालू स्थितीतही होता. त्यानंतर त्याने आपल्या उंचावरून पडलेल्या iPhone ची क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 जानेवारी : सर्व डिव्हासेसमध्ये आयफोनची कायमच चर्चा असते. आयफोन युजर्स iPhone सर्वात मजबूत स्मार्टफोन्सपैकी एक असल्याचं सांगतात. आता आयफोनच्या मजबूतीची चुकून एक टेस्टच झाली आहे. एका स्कायडायव्हरचा फोन जवळपास 12000 फूटांच्या उंचीवरून खाली पडला. इतक्या उंचावरून पडूनही तो सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार, 31 वर्षीय स्कायडायव्हर कोडी मॅड्रोसह ही घटना एलॉय, एरिजोनामध्ये घडली आहे. कोडी या स्कायडायव्हरचे मित्र त्याचं रेकॉर्डिंग करत होते. व्हिडीओ शूट करताना मित्रांना कोडीच्या खिशातून काहीतरी पडताना दिसलं. पंरतु खिशातून काही पडत असल्याची कोडीला कोणतीही कल्पना नव्हती. तो जमिनीवर उतरला त्यावेळी त्याच्याकडे फोन नसल्याचं लक्षात आलं.

फोन जवळ नसल्याचं समजताच त्याने ‘Find my iphone’ च्या मदतीने आपला फोन शोधला. फोन मिळाला आणि तो चालू स्थितीतही होता. त्यानंतर त्याने आपल्या उंचावरून पडलेल्या iPhone ची क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. शेअर केलेल्या क्लिपमध्ये फोनची स्क्रिन अतिशय खराब झाल्याच्या स्थितीत आहे. परंतु दोन आठवड्यापर्यंत iPhone काम करत होता. फोन डॅमेज झालेला असतानाही, योग्यरित्या काम करत होता. 12000 फूट उंचीवरून पडूनही फोन सुरू असल्याचं पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

(वाचा - ट्विटरचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार दणका, अकाउंट केलं कायमचं सस्पेंड!)

View this post on Instagram

A post shared by @kodymadro

कोडीने, इन्स्टाग्रामवर फोन खिशातून पडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात फोन पडल्यानंतरही योग्यरित्या सुरू असल्याचं दिसतं आहे. अनेकांनी तर या पडलेल्या आयफोनचा व्हिडीओ Apple ला पाठवला आहे, जेणेकरून कंपनी त्या स्कायडायव्हरला नवा आयफोन देईल. या व्हिडीओवर अनेक मिश्र प्रतिक्रिया येत असून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

First published:

Tags: Apple, Iphone