Home /News /technology /

बाप रे! एवढ्या किंमतीला युवराज सिंहने खरेदी केली ही जबरदस्त स्पोर्ट्स कार

बाप रे! एवढ्या किंमतीला युवराज सिंहने खरेदी केली ही जबरदस्त स्पोर्ट्स कार

युवराज सिंहकडे BMW M 5 E60, BMW X60M, Audi Q5, Lamborghini Murcielago आणि Bentley Continental GT सारख्या जबरदस्त कार्स आधीपासून आहेत.

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंहने नुकतीच ब्रिटिश कार निर्माता कंपनी मिनी कूपर कंट्रीमॅन स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. या कारची सर्वात विशेष बाब म्हणजे या गाडीचा स्पीड केवळ 7.5 सेकंदात 0-100 किलोमीटर ताशी आहे. कंट्रीमॅन स्पोर्ट्स कार दोन वेरिएंटमध्ये येते, ज्यात पहिल्या वेरिएंटची किंमत 38.5 लाख रुपये आणि दुसऱ्या S JCW वेरिएंटची किंमत 42.4 लाख रुपये आहे. युवराज सिंहने 42.4 लाख रुपयांची कंट्रीमॅन S JCW स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. युवराज सिंहकडे आहे या जबरदस्त कारचं कलेक्शन - युवराज सिंहकडे BMW M 5 E60, BMW X60M, Audi Q5, Lamborghini Murcielago आणि Bentley Continental GT सारख्या जबरदस्त कार्स आधीपासून आहेत. त्यानंतर आता त्याने कंट्रीमॅन S JCW कार खरेदी केली आहे.

  (वाचा - 2021 मध्ये या कार खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या काय आहे कारण)

  कंट्रीमॅन S JCW कार - ब्रिटिश कार निर्माता कंपनी मिनी कूपरच्या कंट्रीमॅन कारचे दोन वेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीने त्यात 2.0 लीटर पेट्रोल इंजन दिलं असून ते 1,350rpm वर 192ps ची पॉवर आणि 230nm चं पीक टॉर्क जनरेट करतं.

  (वाचा - बांबूपासून तयार केलेली Made In India ई-सायकल; जाणून घ्या फीचर्स)

  या कारच्या 37.5 लाख रुपयांच्या वेरिएंटमध्ये कंपनीने 8 स्पीड नॉन-स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलं आहे. तर 42.4 लाख रुपयांच्या वेरिएंटमध्ये कंपनीने 8 स्पीड ऑटोमॅटिक स्टेपट्रॉनिक ट्रान्समिशन दिलं आहे. हे दोन्ही वेरिएंट केवळ 7.5 सेकंदमध्ये 0 ते 100Kmph स्पीड देतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Yuvraj singh

  पुढील बातम्या