मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या Android फोनमध्ये या चुका करू नका, अन्यथा डिव्हाइस हॅक होण्याची शक्यता; या Tips द्वारे राहा सेफ

तुमच्या Android फोनमध्ये या चुका करू नका, अन्यथा डिव्हाइस हॅक होण्याची शक्यता; या Tips द्वारे राहा सेफ

Android Smartphone मध्ये तुम्ही काय डाउनलोड करता आणि कोणत्या डाउनलोड केलेल्या Apps कडे किती परमिशन आहे हे पाहणं गरजेचं आहे. हे पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम असल्याने यावर स्कॅमर्स, हॅकर्स आणि Advertisers ची नजर असते.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : जर तुम्ही Android फोनचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. Android Smartphone मध्ये तुम्ही काय डाउनलोड करता आणि कोणत्या डाउनलोड केलेल्या Apps कडे किती परमिशन आहे हे पाहणं गरजेचं आहे. हे पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम असल्याने यावर स्कॅमर्स, हॅकर्स आणि Advertisers ची नजर असते.

- फोनमध्ये Malware शिवाय असेही अनेक Apps असतात जे सततच्या Ads दाखवून पैसे कमावण्याचं काम करतात. त्यामुळे अँड्रॉइड फोन वापरताना अधिक लक्षपूर्वक त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे फोन सुरक्षित राहण्यासह इतर सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स सेफ राहण्यास मदत होईल.

- काही Apps तुमचा डेटाही कलेक्ट करू शकतात आणि तुमच्या फोनवर Ads दाखवू शकतात. त्यामुळे फोनच्या सेटिंगमध्ये डाउनलोडेड Apps सतत चेक करणं आवश्यक आहे. अनेक मालवेअर आणि स्पायवेअर विना आयकॉन असतात. त्यामुळे अशाप्रकारचे Apps लगेच डिलीट करा.

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

- त्याशिवाय Google अकाउंटचा पासवर्ड सतत अपडेट करत राहा. यामुळे प्रायव्हसी लीक झाल्यासही तुमचं अकाउंट सिक्योर राहण्यास मदत होईल.

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

- जर तुम्ही एखाद्या अनोळखी सोर्सवरुन Apps इन्स्टॉल केले असतील, तर ते डिसेबल करा. यामुळे फोनमध्ये असणारे App तुमच्या माहितीशिवाय इन्स्टॉल होणार नाहीत. Apps कायम अधिकृत सोर्स Google Play Store आणि Apple App Store वरुनच डाउनलोड करा.

- जर तुम्ही APK फाइलवरुन App इन्स्टॉल करत असाल, तर हे तुमच्या डिव्हाइससाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कोणत्याही साइटवरुन App डाउनलोड करू नका.

- नवा फोन घेतल्यानंतर Google फाइंड सर्विस ऑन करणं फायद्याचं ठरतं. तुमचा फोन हरवल्यास अशा परिस्थितीत याची मदत होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Android, Smartphone, Tech news