नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकांना काम करत असताना किंवा व्यायाम करत असताना हेडफोन्स घालून गाणी ऐकायला आवडतं. फोनवर बोलतानाही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याशिवाय अनेकदा युजर्स आपले हेडफोन इतरांबरोबर शेयरही करत असतात. हेडफोन्सची साफसफाई करणं (how to clean headphone cushions) गरजेचं आहे. याकडे लक्ष न दिल्यास ते अस्वच्छ होऊन त्यात घाण साचायला लागते. त्यामुळे हेडफोनच्या अस्वच्छतेमुळे युजर्सच्या कानाला इतर विकारही (how to clean headphone) होण्याचा धोका असतो. काही सोप्या पद्धतीने हेडफोन स्वच्छ करता येऊ शकतात.
कशी काळजी घ्याल -
युजर्सकडे वायर्ड, वायरलेस किंवा वायर-फ्री हेडफोन असतील तरीही त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. हेडफोनची सफाई ही पाण्याने किंवा (how to clean earphones at home) कोणत्याही लिक्विडने करू नये. Earwax Buildup पासून बचावासाठी आठवड्याभरातून तिनदा सफाई करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हेडफोनमध्ये धूळ, अंगठ्याचे ठसे, Earwax किंवा घामापासून बचाव करण्यासाठी त्याला वेळोवेळी साफ करायला हवं.
या टिप्सचा करा उपयोग -
Earbuds चा वापर झाल्यानंतर त्याला Alcohol Wipe ने पुसायला हवं. त्यामुळे Bacteria पासून बचाव करता येऊ शकतो. Alcohol Wipe कोणत्याही किराणा दुकानातून खरेदी करता येऊ शकतं. त्यामुळं हेडफोन साफ होऊन दिर्घकाळ चांगला आवाजही देतात.
मऊ कपड्यांचा करा वापर -
Earbuds ला साफ करताना, त्याला पुसताना मऊ कपड्यांचा वापर करायला हवा. त्यामुळे त्याची सफाई करताना त्यावर Scratches पडत नाही.
Earbuds ला नेहमी Charging Case मध्ये ठेवा -
Earbuds चा वापर झाल्यानंतर त्याला नेहमी चार्जिंग केसमध्ये सुरक्षित ठेवायला हवं. कारण त्यामुळे त्यात पाणी आणि घाण जमा होत नाही. परंतु त्यासाठी चार्जिंग केस ही स्वच्छ असायला हवी. त्यात ओलावा असू नये.
Cleaning Tools चा वापर करा -
Earbuds ला साफ करण्यासाठी Cleaning Tools चा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. त्याची ऑनलाइन खरेदी करता येते. क्लिनिंग टूल्समध्ये ब्रिसल ब्रश, सॉफ्ट ब्रश, स्प्रे बॉटल आणि Anti-Static Cleaning Wipes असल्यामुळे Earbuds ची चांगली सफाई करता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ear, Health Tips