नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : Instagram आपल्या युजर्सला App च्या सततच्या वापारापासून रोखण्यासाठी एका नव्या फीचरचं टेस्टिंग करत आहे. 'Take a Break' नावाचं हे फीचर युजर्सला फोटो शेअरिंग App इन्स्टाग्रामच्या वापरादरम्यान नियमित ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहित करेल.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक अ ब्रेक फीचर एखाद्या युजरला तो किती वेळापासून Instagram चा वापर करत आहे, हे सांगेल.
Adam Mosseri यांनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे सांगितलं, की हे फीचर युजरला निश्चित वेळेत 10, 20 किंवा 30 मिनिटांत्या सततच्या वापरानंतर ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. हे फीचर सध्या टेस्टिंगमध्ये आहे. मोसेरी यांनी Take a Break फीचर युजर्ससाठी येत्या डिसेंबरपर्यंत लाँच होण्याचं म्हटलं आहे.
Testing “Take a Break” We started testing a new feature called “Take a Break” this week. This opt-in control enables you to receive break reminders in-app after a duration of your choosing. I’m excited to dig into the results & hopefully launch this sometime in December. ✌ pic.twitter.com/WdSTjL6ZdH
— Adam Mosseri (@mosseri) November 10, 2021
मागील काही दिवसांपूर्वी Instagram मुळे तरुणांवर, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे आरोप झाले होते. इन्स्टाग्राम तरुणांसाठी हानिकारक असल्याचं म्हटलं गेलं होतं.
एका अमेरिकी व्हिसलब्लोअर फ्रांसेस हॉगेन यांनी खुलासा केला, की सोशल मीडिया App तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहेत. त्यानंतर आता इन्स्टाग्रामकडून ही पावलं उचचली जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post