मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Online शॉपिंगवेळी सावधान, Amazon Email द्वारे असा होतोय Fraud; जाणून घ्या काय आहे प्रकार

Online शॉपिंगवेळी सावधान, Amazon Email द्वारे असा होतोय Fraud; जाणून घ्या काय आहे प्रकार

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता ईमेल फ्रॉडचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्स आता Online Shopping Site Amazon च्या वेबपेजच्या लिंक ईमेलचा उपयोग करुन युजर्सची फसवणूक करत आहेत.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता ईमेल फ्रॉडचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्स आता Online Shopping Site Amazon च्या वेबपेजच्या लिंक ईमेलचा उपयोग करुन युजर्सची फसवणूक करत आहेत.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता ईमेल फ्रॉडचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्स आता Online Shopping Site Amazon च्या वेबपेजच्या लिंक ईमेलचा उपयोग करुन युजर्सची फसवणूक करत आहेत.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : देशात एकीकडे ऑनलाइन व्यवहार, ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ होत असून दुसरीकडे हॅकर्सकडून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात SMS, Email, Link अशा अनेक प्रकारे लोकांची फसवणूक होत असून Online Fraud मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग साइटवर खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता ईमेल फ्रॉडचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्स आता Online Shopping Site Amazon च्या वेबपेजच्या लिंक ईमेलचा उपयोग करुन युजर्सची फसवणूक करत आहेत. हे फ्रॉड करणारे लोकांना असे ईमेल पाठवतात, जे हुबेहुब Amazon कडूनच आले असल्याचं वाटू शकतं. परंतु असे ईमेल पूर्णपणे फेक आहेत. हळूहळू युजर या फ्रॉडच्या जाळ्यात अडकत जातो आणि शेवटी संपूर्ण पैसे गमावतो.

Missed call पासून SMS पर्यंत, PF Account Balance जाणून घेण्याच्या 4 सोप्या पद्धत

Amazon Email Scam -

Express.co.uk रिपोर्टनुसार, ईमेलमध्ये अगदी खऱ्या साइटप्रमाणे दिसणाऱ्या ई-कॉमर्स साइटची लिंक आणि एक खरेदी पावती सामिल असते. या ईमेलमध्ये एखाद्या महागड्या वस्तूच्या खोट्या-बनावट पावत्या आणि त्याचा तपशील दिलेला असतो. युजर ज्यावेळी हा ईमेल पाहतो, त्यावेळी अशा पावत्या पाहून हैराण होतो, कारण असं कोणतंही सामान त्यांनी खरेदी केलेलं किंवा मागवलेलं नसतं.

शेवटी युजर ईमेलमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करतात. परंतु या कॉलला कोणतंही उत्तर दिलं जात नाही. त्यानंतर युजरला पुन्हा कॉल केला जातो आणि ही ऑर्डर रद्द करण्यासाठी बँक डिटेल्स शेअर करण्यासाठी सांगितले जातात.

युजरने एकदा बँक डिटेल्स दिल्यानंतर तो पुढे काहीही करू शकत नाही. स्कमर्स डेटा चोरी करतात आणि युजरचं बँक अकाउंट रिकामं करतात. त्याशिवाय इतरही महत्त्वाचे डिटेल्स मिळवतात.

विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

खोटे-बनावट ईमेल पाठवण्यासाठी फ्रॉड करणारे Gmail Account चा वापर करतात. महत्त्वाची बाब म्हणजे Amazon कधीही पावती शेअर करण्यासाठी Gmail चा वापर करत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही ईमेलला उत्तर देऊ नका. ईमेल आयडी तपासा. कोणतेही डिटेल्स ओटीपी, बँक लॉगइन, डेबिट कार्ड किंवा इतर पर्सनल माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका. बँकदेखील कधीही अशी माहिती फोन, ईमेलवर मागत नाही. त्यामुळे कोणीही कॉल करुन अशा डिटेल्सची मागणी केल्यास, सावध व्हा.

First published:
top videos

    Tags: Amazon, Online fraud, Online shopping