मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'या' स्मार्टफोन्समध्ये मिळणार अँड्रॉइड 12; जाणून घ्या ब्रँड्सची नावं

'या' स्मार्टफोन्समध्ये मिळणार अँड्रॉइड 12; जाणून घ्या ब्रँड्सची नावं

smartphons

smartphons

गुगलने (Google) स्मार्टफोन युझर्ससाठी एक खुशखबर आणली आहे. गुगलने आता अँड्रॉइड 12 हे व्हर्जन लॉन्च केलं आहे.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर:  गुगलने (Google) स्मार्टफोन युझर्ससाठी एक खुशखबर आणली आहे. गुगलने आता अँड्रॉइड 12 हे व्हर्जन लॉन्च केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुगलचं बीटा टेस्टिंग (Beta testing) सुरू होतं. त्यानंतर, गुगलने आता अधिकृतपणे अँड्रॉइडचं नवीन व्हर्जन लॉन्च केलं. मे महिन्यामध्ये पहिली घोषणा केल्यानंतर अँड्रॉइड 12 हे व्हर्जन गुगल पिक्सेल (Google Pixel) फोनवर उपलब्ध करण्यात आलं होतं. आता अँड्रॉइड 12 (Android 12) ऑपरेटिंग सिस्टीमचं अपडेटेड व्हर्जन वनप्लस (OnePlus), ओप्पो (Oppo), रियलमी (Realme), शाओमी (Xiaomi) आणि विवो (Vivo) यांसारख्या प्रमुख स्मार्टफोन ब्रँड्सच्या नवीन फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.

अँड्रॉइडच्या सर्व फोर्क-अप एडिशनमध्ये मिळत असलेल्या कस्टमायझेशनमुळं स्मार्टफोनमध्ये नवीन व्हर्जन मिळण्यास उशीर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अँड्रॉइड 12 रोलआउटसाठी प्रत्येक स्मार्टफोन ब्रँडचा स्वतःचा एक रोडमॅप असतो. म्हणूनच हे व्हर्जन शाओमीच्या फोनऐवजी ओप्पोच्या फोनवर खूप अगोदर येण्याची शक्यता आहे. या वर्षअखेरीस बहुतेक ब्रँडेड फोन्समध्ये अँड्रॉइड 12वर आधारित कस्टम सॉफ्टवेअर मिळेल.

पुढील फोनमध्ये अँड्रॉइड 12 उपलब्ध होणार आहे -

ओप्पो (Oppo)

ओप्पोनं आपल्या फ्लॅगशिप फोनसाठी अँड्रॉइड 12 रोलआउट केलं आहे. बीटामध्ये उपलब्ध असलेल्या ColorOS 12 मध्ये गुगलने अँड्रॉइड 12सह आणलेली सर्व वैशिष्ट्यं उपलब्ध आहेत. या वर्षअखेरीस ओप्पोच्या काही स्मार्टफोन्समध्ये ColorOS 12 बीटा मिळेल.

रियलमी (Realme)

रियलमी हासुद्धा आपल्या फ्लॅगशिप फोनसाठी अँड्रॉइड 12 बीटा आणणारा ब्रँड आहे. त्याचे जीटी फ्लॅगशिप अगोदरच रियलमी UI 3.0 बीटा सॉफ्टवेअर चालवू शकते. काही वैशिष्ट्यं वगळता, रियलमी UI 3.0 हे ColorOS 12 सारखंच आहे. याशिवाय या वर्षाच्या रोडमॅपवर आणखी काही फोन आहेत.

वनप्लस (OnePlus)

वनप्लसनेदेखील आपल्या फ्लॅगशिप फोनसाठी बीटा सॉफ्टवेअर रोलआउट केलं आहे. वनप्लसच्या लेटेस्ट फोनमध्ये अँड्रॉइड 12 अपडेट मिळणार आहे. जेव्हापासून ओप्पोनं वनप्लसचं R&D सॉफ्टवेअर स्वतःमध्ये विलीन करून घेतलं आहे, तेव्हापासून गोष्टी बदलण्यासाठी थोडा वेळ लागत आहेत. कंपनीने सध्या केवळ वनप्लस 9 (OnePlus 9) सीरिजसाठी अँड्रॉइड 12 बीटा प्रोग्राम घेतला आहे; मात्र त्याच्या रोलआउटची तारीख अद्याप ठरवण्यात आलेली नाही. वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो, वनप्लस 9 आर आणि वनप्लस 9 आरटी या फोनमध्ये अँड्रॉइड 12 मिळणार आहे.

आयक्यूओओ (iQOO)

आयक्यूओओनं अलीकडेच आपला अँड्रॉइड 12 रोलआउट रोडमॅप जाहीर केला आहे. हा ब्रँड सध्या विकत असलेले सर्व फोन अँड्रॉइड 12वर आधारित आयक्यूओओ UI सॉफ्टवेअर अपग्रेडसाठी पात्र आहेत. सध्या या कंपनीचे आयक्यूओओ 7, आयक्यूओओ 7 लिजंड, आयक्यूओओ Z3 आणि आयक्यूओओ Z5 हे फोन बाजारात उपलब्ध आहेत.

व्हिवो (Vivo)

व्हिवोने नोव्हेंबरपासून फ्लॅगशिप आणि मिड-रेंज फोनवर अँड्रॉइड 12 रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण यादीमध्ये 31 फोन्सचा समावेश असणार आहे. व्हिवोनं अद्याप आपल्या फनटच OS 12 साठी बीटा सॉफ्टवेअर रोलआउट करणं सुरू केलेलं नाही. लवकरच त्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शाओमी (Xiaomi)

शाओमी हा स्मार्टफोन ब्रँड 2021च्या अखेरीस अँड्रॉइड 12 रोलआउट करण्यास सुरुवात करणार आहे. रोलआउटच्या पहिल्या टप्प्यात अपडेटसाठी कोणते फोन पात्र असतील याची यादी कंपनीनं अद्याप शेअर केलेली नाही.

First published:

Tags: Google