जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Netflix चं खास अपडेट, आता युजर्सला TikTok सारखे व्हिडीओ पाहण्यासह मिळणार Gaming ची सुविधा

Netflix चं खास अपडेट, आता युजर्सला TikTok सारखे व्हिडीओ पाहण्यासह मिळणार Gaming ची सुविधा

Netflix चं खास अपडेट, आता युजर्सला TikTok सारखे व्हिडीओ पाहण्यासह मिळणार Gaming ची सुविधा

नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी दोन खास अपडेट उपलब्ध करून दिले आहेत. नेटफ्लिक्सने नवीन गेमिंग सर्व्हिस सुरू केली आहे. यासोबतच Netflix Inc ने लहान मुलांसाठी टिकटॉकसारखं एक फीचर सुरू केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : सध्या नेटफ्लिक्स (Netflix) हा जगातला सर्वांत लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म (Streaming platform) बनला आहे. विविध विषयांच्या वेबसीरिज, मूव्हीज, डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी लोक नेटफ्लिक्सला पसंती देत आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी दोन खास अपडेट उपलब्ध करून दिले आहेत. नेटफ्लिक्सने नवीन गेमिंग सर्व्हिस (Gaming service) सुरू केली आहे. यासोबतच Netflix Inc ने लहान मुलांसाठी टिकटॉकसारखं (TikTok) एक फीचर (Feature) सुरू केलं आहे. यामुळे नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर आणखी युजर्स वाढण्यास मदत होणार आहे. नेटफ्लिक्सच्या आयओएस (iOS) अ‍ॅपवर ‘किड्स क्लिप’ हे नवीन फीचर अ‍ॅड करण्यात आलं आहे. कंपनीच्या सध्याच्या लायब्ररीमध्ये असलेले लहान मुलांचे कार्यक्रम आणि चित्रपट यांच्या शॉर्ट व्हिडीओ क्लिप या नवीन फीचरमध्ये दाखवल्या जाणार आहेत. याशिवाय नवीन फीचरच्या आधारे, नेटफ्लिक्स आपल्या सध्याच्या आणि भविष्यात सादर होणाऱ्या कार्यक्रमांवर आधारित असलेल्या नवीन क्लिप दररोज जोडण्याचा विचार करत आहे. व्हिडीओ-स्ट्रीमिंग नेटफ्लिक्स सातत्याने नवीन फीचर्सचा आणत आहे, जेणेकरून युजर्सना कॅटलॉगमध्ये अधिक माहिती मिळेल. जे युजर्स सहसा यू-ट्यूब (YouTube) किंवा टिकटॉकवर छोट्या व्हिडीओ क्लिप्स पाहतात, अशांसाठी हे खास फीचर आणण्यात आलं आहे.

    Instagram आता नसणार फुकट? महिन्याला 89 रुपये मोजावे लागणार

    व्हिडीओ-स्ट्रीमिंगमध्ये अग्रगण्य असलेल्या नेटफ्लिक्सने सुरुवातीला आपल्या अँड्रॉइड युजर कस्टमर्ससाठी नवीन गेमिंग सर्व्हिस सुरू केली होती. त्यात कंपनीला यश मिळाल्यामुळे कंपनीने आता आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठीदेखील गेमिंग सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन आणि आयपॅडचा वापर करून नेटफ्लिक्स पाहणारे सर्व युजर्स आजपासून (11 नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या या गेमिंग फीचरचा लाभ घेऊ शकतात.

    Missed call पासून SMS पर्यंत, PF Account Balance जाणून घेण्याच्या 4 सोप्या पद्धत

    नेटफ्लिक्स गेम आयओएसवर येत असल्याची घोषणा कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे आता जगभरात कोणत्याही स्मार्टफोन डिव्हाइसवरून नेटफ्लिक्स गेम्स अ‍ॅक्सेस करता येणार आहेत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, नेटफ्लिक्स आपले सर्व गेम्स अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर वेगवेगळे रिलीज करेल आणि युजर्सना नेटफ्लिक्स अ‍ॅपच्या माध्यमातून गेम लाँच करू देईल. मात्र ते नेटफ्लिक्स अ‍ॅपमधून डाउनलोड करून खेळणं शक्य नाही. नेटफ्लिक्स गेम डाउनलोड करण्यासाठी ग्राहकांना अ‍ॅप स्टोअरवर रीडायरेक्ट केलं जाईल. डिव्हाइसमध्ये गेम प्लेअर्सनी गेम इन्स्टॉल केल्यानंतर नेटफ्लिक्स अ‍ॅपमध्ये जाऊन गेम लॉन्च करता येईल. दरम्यान, अँड्रॉइडवर नेटफ्लिक्स मेंबर असलेले युजर्स स्ट्रेंजर थिंग्ज : 1984 (बोनसएक्सपी), स्ट्रेंजर थिंग्ज 3 : द गेम (बोनसएक्सपी), शूटिंग हूप्स (फ्रॉस्टीपॉप), कार्ड ब्लास्ट (अम्यूजो आणि रफ सेरे) आणि टीटर अप (फ्रॉस्टीपॉप) हे पाच गेम खेळू शकतात. एका मेंबरशिपच्या मदतीने अनेक मोबाइल डिव्हाइसवर गेम खेळता येऊ शकतात. काही मोबाइल गेम्ससाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असेल, तर काही गेम ऑफलाइन उपलब्ध असतील, जेणेकरून युजर्सना लांबचा प्रवास किंवा खराब कनेक्टिव्हिटी असतानाही गेमची मजा घेता येईल. नेटफ्लिक्सच्या नवीन दोन फीचर्समुळे युजर्सच्या मनोरंजनामध्ये आणखी वाढ होणार आहे. गेमिंगमुळे नेटफ्लिक्सचे युजर्स वाढण्याचीही शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: netflix
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात