मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अलर्ट! तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 8 Apps असल्यास लगेच करा डिलीट, Google नेही उचललं हे पाउल

अलर्ट! तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 8 Apps असल्यास लगेच करा डिलीट, Google नेही उचललं हे पाउल

क्विक हिल सिक्योरिटी लॅबच्या (quick heal security lab) रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरच्या (google play store) अशा 8 अ‍ॅप्सचा शोध लावला आहे, ज्यात जोकर मालवेअर आढळला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 जून : कोरोना काळात अनेक हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. अनेक मालवेअर, हॅकिंगद्वारे पैसे चोरी केले जात आहेत. आता जोकर मालवेअरने (Joker Malware) पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. क्विक हिल सिक्योरिटी लॅबच्या (quick heal security lab) रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरच्या (google play store) अशा 8 अ‍ॅप्सचा शोध लावला आहे, ज्यात जोकर मालवेअर आढळला आहे. रिसर्चर्सने सांगितलं, की जर स्मार्टफोनमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप्स असतील, तर ते फोनमधून लगेच डिलीट करण्याची गरज आहे. जोकर अतिशय धोकादायक मालवेअरपैकी एक असून हा सतत Android डिव्हाईसला टार्गेट करतो. जोकर मालवेअर असा व्हायरस आहे, जो दर काही महिन्यांनी Google Play Store वर परत येण्यास, आपला मार्ग शोधण्यास सफल होतो.

रिसर्चर्सनुसार, जोकर मालवेअर युजर्सचा डेटा चोरी करतात, ज्यात SMS, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिव्हाईस डिटेल, OTP सारखी माहिती सामिल आहे. गुगलने हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन डिलीट केले आहेत, परंतु जर एखाद्या युजरने हे आधीच डाउनलोड केले असतील, तर ते जोपर्यंत डिलीट केले जात नाहीत, तोपर्यंत फोनमध्येच राहतील. त्यामुळे फोनमधून हे अ‍ॅप डिलीट करणं आवश्यक आहे.

(वाचा - ऑनलाईन फ्रॉड झाल्यास इथे करा तक्रार, गृह मंत्रालयाकडून Helpline नंबर जारी)

हे 8 Apps असल्यास, लगेच करा डिलीट -

>>Auxiliary Message

>>Fast Magic SMS

>> Free CamScanner

>>Super Message

>> Element Scanner

>> Go Messages

>> Travel Wallpapers

>> Super SMS

(वाचा - तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 सरकारी Apps, हे आहेत फायदे)

कसे डिलीट कराल?

गुगल प्ले स्टोरवर जा, इथे तुमच्याकडे असलेलं मालवेअरवालं अ‍ॅप सर्च करा. त्यानंतर अ‍ॅप पेजवर ‘Uninstall’ करा. अशाप्रकारे फोनमधील अ‍ॅप हटवले जातील. तसंच युजर होम स्क्रिनवर जाऊनही अ‍ॅपवर लाँग प्रेस करुन, ‘x’ आयकॉन मिळतो, तिथूनही डिलीट करू शकतात.

First published:

Tags: Android, Malware, Smartphone, Tech news