नवी दिल्ली, 28 मार्च : देशासह जगभरात कोरोनाचा विळखा पसरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संशोधक, डॉक्टर्स, आरोग्य संस्था अनेक प्रयत्न करत आहेत. आता संशोधकांनी एक अशी स्टँप साईज चिप बनवली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वत:च कोविड-19 ची टेस्ट करू शकता. ही टेस्ट तुमच्या स्मार्टफोनवर होऊ शकते, ज्याचा रिझल्ट केवळ 55 मिनिटांच्या आत येईल, असं सांगण्यात आलं आहे. या मायक्रोफ्ल्यूडिक चिपला Rice यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बनवलं आहे. या नॅनोबीड्स चिपद्वारे 55 मिनिटांच्या आत तुमच्या स्मार्टफोनवर कोरोनाचा रिपोर्टही मिळेल. ही प्रक्रिया स्वॅब टेस्टच्या तुलनेत अतिशय सहज असल्याचं या संशोधनाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
राइस लॅबचे मॅकेनिकल इंजिनियर पीटर लिल्होज यांनी सांगितलं की, या डिव्हाईसमुळे लोकांना कोरोना टेस्टसाठी लॅबमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. कोरोना टेस्टची ही संपूर्ण प्रक्रिया एका फोनद्वारे होईल.
या नव्या चिपबाबत असं सांगण्यात आलं की, ही चिप अतिशय कमी वेळात अचूक रिझल्ट देईल. गुगल पिक्सल 2 फोनसह potentiostat नावाच्या एका डिव्हाईसला कनेक्ट केलं जातं, जो केवळ 230 पिकोग्रॅम सिरमने टेस्टला पूर्ण करतो. ही टेस्ट अँटीबॉडी टेस्टसारखी आहे, यातही अँटीबॉडीबाबत माहिती मिळवली जाऊ शकते.
चिपवर सँपल टाकल्यानंतर एका ट्यूबचा वापर केला जातो. त्यानंतर चिपमध्ये एक मॅग्नेट असतं, जे सिरमला थेट इलेक्ट्रोकेमिकल सेंसरपर्यंत पोहचवतो. शेवटी चिप फोनमध्ये असलेल्या अॅपपर्यंत इतर माहिती पोहचवतो, त्यानंतर प्रोसेस पूर्ण होते आणि शेवटी स्मार्टफोनवर कोरोना रिझल्ट समजतो.
मागील वर्षी याच टीमने Rice यूनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसोबत मिळून एका टेक्नोलॉजीचा विकास केला होता, जो मलेरियाचा शोध लावू शकतो. आता कोरोनासाठीच्या टेस्टची ही टेक्नोलॉजी येणाऱ्या काळात उपलब्ध झाली, तर जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अंशी मदत होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.