मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही Google Pay चा UPI पिन विसरलाय? पाहा नवीन PIN सेट करण्याची सोपी प्रोसेस

तुम्ही Google Pay चा UPI पिन विसरलाय? पाहा नवीन PIN सेट करण्याची सोपी प्रोसेस

अनेकांना खिशात कॅश बाळगणं आवडत नाही. अशा वेळी ते दिवसभरातील व्यवहारांसाठी डिजीटल पेमेंट्स Apps चा वापर करतात. परंतु अनेक विसरभोळ्या लोकांना एकदा Google Pay चा UPI PIN सेट (Change UPI PIN on Google Pay) केल्यानंतर लक्षात राहत नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : सध्या धावपळीच्या जगात लोक ऑनलाईन पेमेंट्सला प्राधान्य देत असून त्यात गूगल पे आणि फोन पेचा समावेश आहे. अनेकांना खिशात कॅश बाळगणं आवडत नाही. अशावेळी ते दिवसभरातील महत्त्वाच्या व्यवहारांसाठी डिजीटल पेमेंट्स Apps चा वापर करत आहेत. परंतु अनेकदा विसरभोळ्या लोकांना एकदा Google Pay चा UPI PIN सेट (Change UPI PIN on Google Pay) केल्यानंतर लक्षात राहत नाही.

असं काही झाल्यास पेमेंट करताना समस्या निर्माण होते. त्यामुळं आता Google Pay वर UPI पिन बदलण्यासाठी काय नेमकी प्रोसेस आहे? हे आपण जाणून घेऊयात. जर UPI PIN युजर्सच्या लक्षात राहिला नसेल किंवा सुरक्षेच्या कारणास्तव (how to change upi pin in Google Pay) पिन बदलायचा असेल तर त्यासाठी अतिशय सोपी प्रोसेस आहे.

WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

जर युजर्सने पेमेंच करताना 3 पेक्षा अधिकवेळा पेमेंट करताना गूगल पेचा चुकीचा पिन टाकला तर पुढील 24 तासांसाठी संबंधित युजर्सचे व्यवहार गूगल पे (Google pay reset incorrect pin) कडून ब्लॉक करण्यात येत असतात. त्यामुळं लक्षात राहिल असा, सोपा आणि सुरक्षित UPI PIN युजर्सला सेट करावा लागतो. त्यासाठी काही विशेष काळजीदेखील घ्यावी लागते.

40000 रुपयांपर्यंत बजेट लॅपटॉप खरेदी करायचाय? हे आहेत सर्वात BEST पर्याय

अशी आहे प्रोसेस...

सर्वात आधी युजर्सने आपलं गूगल पे खातं ओपन करायला हवं. त्यानंतर प्रोफाईलवर जाऊन Bank Account च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्या बँक अकाउंटला जोडलेल्या UPI PIN चेंज करायचा आहे त्या खात्याला सेलेक्ट करा. त्यानंतर Forget UPI PIN च्या पर्यायावर क्लिक करून आपल्या डेबिट कार्डवरील (how to reset upi pin with debit card) शेवटचे 6 अंक टाका.

चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

त्यानंतर नवीन UPI PIN सेट करण्यासाठीचा पर्याय ओपन होईल. त्याचबरोबर युजर्सच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो योग्यरित्या टाकल्यानंतर युजर्सचा नवा UPI PIN तयार होईल. त्यानंतर नव्या युपीआय पिनमार्फत Google Pay वर बँक अकाउंटवरील रक्कम चेक करून पाहा.

First published:

Tags: Google, Online payments, Password, QR code payment, Upi