मुंबई, 05 नोव्हेंबर: दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे 'वर्क फ्रॉम होम' (work from home) कल्चरमध्ये आणि ऑनलाइन शिक्षणात झालेल्या वाढीमुळे लॅपटॉपला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतले कर्मचारी मोठ्या प्रमाणात लॅपटॉपचा वापर करताना दिसत आहेत. परिणामी लॅपटॉप खरेदी केल्या जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांनी ग्राहकांना परवडतील अशा प्रकारचे विविध लॅपटॉप्स बाजारात आणले आहेत. सध्या बाजारात 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्येही चांगले लॅपटॉप मिळत आहेत. जाणून घ्या कोणत्या लॅपटॉपची खरेदी तुम्ही बजेटमध्ये करू शकता. सर्वसामान्य क्षमतेच्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून काम करणाऱ्यांसाठी हे लॅपटॉप चांगले पर्याय ठरू शकतात.
रेडमी बुक ई-लर्निंग एडिशन (RedmiBook E-Learning Edition)
रेडमी बुक ई-लर्निंग एडिशनमध्ये इलेव्हन्थ जनरेशन कोअर आय थ्री (11th generation Intel Core i3) आहे. 40 हजार रुपये किंमत (laptop under 40 thousand) असलेल्या या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम, 512 जीबी PCIe NVMe SSD स्टोरेजची सुविधा आहे.
असूस व्हिवो बुक 14 इंटेल आय थ्री (Asus VivoBook 14 Intel i3)
असूस व्हिवो बुक 14 इंटेल आय थ्री हा लॅपटॉप 39 हजार 990 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये इंटेलचं इलेव्हन्थ जनरेशन कोर आय थ्री 1115G4 प्रोसेसर देण्यात आला आहे. 14-इंचांची FHD LCD स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी NVMe PCIe SSD स्टोरेज क्षमता आहे.
डेल वोस्त्रो 3401 (Dell Vostro 3401)
डेल वोस्त्रो 3401 मध्ये इंटेलचा इलेव्हन्थ जनरेशन कोर आय थ्री प्रोसेसर आहे. अॅमेझॉनवर 39 हजार 639 रुपयांना उपलब्ध असलेल्या या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आणि 1 टीबी HDD स्टोरेज क्षमता आहे.
एचपी 15 रायझेन 3 (HP 15 Ryzen 3)
38 हजार 990 रुपयांना उपलब्ध असलेल्या एचपी 15 रायझेन 3 या लॅपटॉपमध्ये एएमडी Ryzen 3 3250U चिप आहे. 8 जीबी रॅम आणि 256GB SSD स्टोरेज क्षमता असलेल्या या लॅपटॉपचा डिस्प्ले 15.6 इंचाचा आहे.
लेनोव्हो आयडियापॅड स्लिम 3 (Lenovo IdeaPad Slim 3)
37 हजार 990 रुपये किंमत असलेल्या लेनोवो आयडिया पॅड स्लिम 3ची अॅमेझॉन या ई-कॉमर्स साइटवर विक्री सुरू आहे. यामध्ये टेन्थ जनरेशन इंटेल आय थ्री (10th generation Intel i3) प्रोसेसर आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी SSD स्टोरेज क्षमता असलेल्या लॅपटॉपमध्ये 14 इंचांचा FHD डिस्प्ले आहे.
एसर अॅस्पायर 5 (Acer Aspire 5)
14 इंचांचा डिस्प्ले असलेल्या एसर अॅस्पायर 5ची किंमत 36 हजार 990 रुपये इतकी आहे. इंटेल कोअर आय थ्री (Intel Core i3) प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 256 जीबी PCIe NVMe SSD स्टोरेज अशा सुविधा यामध्ये मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.