मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. कंपनीनं 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याचा विचार केला आहे.

WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. कंपनीनं 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याचा विचार केला आहे.

WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. कंपनीनं 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याचा विचार केला आहे.

    मुंबई, 05 नोव्हेंबर: प्रायव्हेट मेसेजिंगसाठी सोशल मीडिया (Social Media Apps) प्लॅटफॉर्म्सपैकी व्हॉट्सअ‍ॅपला (WhatsApp Feature Update) सर्वात जास्त पसंती दिली जाते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नेहमी एकापेक्षा एक फीचर्स (WhatsApp Latest Update) आणत असते. लवकरच हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. कंपनीनं 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याचा विचार केला आहे. डिलीट फॉर एव्हरीवन (WhatsApp Delete for Everyone feature) फिचरमुळं आपण एकदा पाठवलेला मेसेज ठराविक काळाच्या आत डिलीट करू शकतो. समोरच्या व्यक्तीनं तो मेसेज पाहिलेला असो किंवा नसो मेसेज डिलीट करता येतो. ज्या लोकांकडून वारंवार चुकून एखादा मेसेज, फोटो, किंवा व्हिडीओ पाठवला जातो, असे लोक या फिचरचा जास्त वापर करतात.

    व्हॉट्सअ‍ॅप फॉर अँड्रॉइड बीटा v2.21.23.1 मध्ये मिळालेल्या तपशीलानुसार, 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचरची वेळ मर्यादा 4 हजार 96 सेकंदांपासून अनिश्चित काळासाठी वाढवली जाऊ शकते, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर, WABetaInfoनं दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं 2018 डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर सादर केलं होतं. तेव्हापासून मेसेज पाठवल्यानंतर 4 हजार 96 सेकंदांपर्यंत आपण तो डिलीट करू शकत होतो.

    हे वाचा-Aadhaar Card चा गैरवापर करणं पडेल भारी, होईल इतक्या कोटींचा होणार दंड

    व्हिडीओसाठी येणार नवीन फीचर

    WABetaInfo च्या आणखी एका रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅप आयओएस (iOS) वर एक नवीन व्हिडीओ प्लेबॅक इंटरफेस मिळत आहे. यामुळं युजर्स फुलस्क्रीनमध्ये व्हिडीओ प्ले करू किंवा पिक्चर-इन-पिक्चर विंडो बंद करू शकतात. अ‍ॅपच्या काही आयओएस बीटा टेस्टर्सला v2.21.220.15 वर हे फंक्शन मिळत असल्याचं म्हटलं जातं आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस अँड्रॉइड डिव्हाइमधील बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर सादर करण्यात आलं होतं.

    हे वाचा-लाँच आधीच लीक झाले Vivo V23E फीचर्स, पाहा Smartphone मध्ये काय असेल खास

    याशिवाय काही आयओएस बीटा टेस्टर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये यु ट्युब (YouTube) व्हिडीओ प्ले करण्याच्या पद्धतीमध्ये बदल दिसू शकतात. हे व्हिडीओ ऑटोमॅटिक फुलस्क्रीन मोडमध्ये दाखवले जातील, असं देखील ट्रॅकर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या फीचरवर अद्याप काम सुरू आहे. त्यामुळं बीटा टेस्टर्सचा अहवाल येईपर्यंत हे फीचर टेस्टिंगम्हणूनचं दिलं जावं, असंही रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. हे फीचर सर्वांना वापरसाठी कधी रिलीज केलं जाणार आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

    First published:
    top videos

      Tags: Whatsapp, Whatsapp alert